आज ते पप्पी घेत आहेत… ठाकरे कुणाचेच नाहीत; गुलाबराव पाटील यांची खोचक टीका

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडी सोडल्यानंतर, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या अस्तित्वाबद्दल शंका व्यक्त केल्या असून, भाजपलाही ठाकरे गटाबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पाटील यांनी ठाकरे गटाने विचारधारा सोडल्याची टीका केली असून, त्यांच्या भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

आज ते पप्पी घेत आहेत... ठाकरे कुणाचेच नाहीत; गुलाबराव पाटील यांची खोचक टीका
gulabrao patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 12:28 PM

महाविकास आघाडीत मोठी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी अस्तित्वात नसणार आहे. त्यातच आता ठाकरे गटाने भाजपशी जवळीक साधण्याचाही प्रयत्न केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपलं अस्तित्व टिकवण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचा सारा खटाटोप सुरू आहे, अशी टीका करतानाच पण ठाकरे कुणाचेच नाहीत, असा सल्लाही गुलाबराव पाटली यांनी भाजपला दिला आहे.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना तू राहतो का मी राहतो, असं म्हटलंय आज तेच ठाकरे त्यांची पप्पी घेत आहेत. आज ते स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी वाटेल त्या ठिकाणी जात आहेत. आता ते काँग्रेसशी फारकत घेत आहेत. राष्ट्रवादीशी फारकत घेत आहेत. काही राष्ट्रवादीचे नेते नाराज होऊन नेतृत्व बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे चित्र काही ठिकाण्यावर नाही. पुढच्या काळात डबडं वाजणार आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

फडणवीस यांना सल्ला

विचारधारा सोडून काही लोक आमच्यापासून दूर गेले. आम्ही भगव्या झेंड्यासाठी फडणवीस यांच्यासोबत आलो. आता ते लोक पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतील तर थोडा विचार फडणवीस यांनी करावा. जेव्हा आपली गरज होती, जेव्हा आपला पक्ष अडचणीत होता, जेव्हा मोदींचं सरकार येण्यासाठी आपण प्रयत्न करत होतो, तेव्हा हे लोक कोणासोबत होते? आता यांच्याकडे काहीच राहिलं नाही. त्यामुळे ते तुमच्याकडे येत आहेत, तुमच्याशी गोड बोलत आहेत. पण हे कुणाचेच नाहीत. याचा निश्चितपणे विचार करावा, असा सल्ला गुलाबराव पाटील यांनी फडणवीस यांना दिला आहे.

जो बुंद से गयी…

आपण आपली मूळ विचारधारा सोडली होती हे त्यांना आता कळायला लागलं आहे. पण जो बूंद से गयी वो हौद से नही आने वाली. ज्यांनी भगवा सोडला, त्यांनी पुन्हा भगवा पकडला की हात थरथरतात हे आता त्यांच्या लक्षात आलं आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी
भगवे कपडे अन् रूद्राक्ष माळ्या... किन्नर आखाड्यात अभिनेत्री संन्यासी.
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या
मुंबईत हवालदाराच्या लेकानं वडिलांच्या बंदुकीतून झाडल्या स्वत:वर गोळ्या.
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी
धसांनी घेतली कॉवत यांची भेट अन् त्या हत्याप्रकरणासंदर्भात केली मागणी.
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार
'लालपरी'सह रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार, ‘इतके’ रुपये मोजावे लागणार.
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप
'ते म्हणाले तुला मारणार...', कराडचा उल्लेख अन् गित्तेकडून गंभीर आरोप.
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?
'मुन्नी बदनाम हुई अशी अवस्था...', सुरेश धस यांचा नेमका रोख कुणावर?.
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'.
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही.
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी.
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल...
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल....