AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cidco : सिडकोची नवी मुंबईकरांना होळी भेट, 6508 घरं विक्रीसाठी उपलब्ध करणार

होळी(Holi) सणाचे औचित्य साधत सामान्य नागरिकांच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी सिडकोतर्फे (Cidco) 5730 घरांची महागृहनिर्माण योजना 2022 अंतर्गत नवी मुंबईतील (Navi Mumbai) विविध नोडमधील अतिरिक्त घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

Cidco : सिडकोची नवी मुंबईकरांना होळी भेट, 6508 घरं विक्रीसाठी उपलब्ध करणार
सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेसाठी 5 हजार कोटींचा पतपुरवठा प्राप्तImage Credit source: TV9
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Mar 15, 2022 | 8:44 PM
Share

नवी मुंबई :होळी(Holi) सणाचे औचित्य साधत सामान्य नागरिकांच्या आयुष्यात रंग भरण्यासाठी सिडकोतर्फे (Cidco) 5730 घरांची महागृहनिर्माण योजना 2022 अंतर्गत नवी मुंबईतील (Navi Mumbai) विविध नोडमधील अतिरिक्त घरं विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आता या योजनेच्या माध्यमातून एकूण 6,508 घरं विक्रीकरिता उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना योजनेचा लाभ घेऊन नवी मुंबईमध्ये आपले हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करणे शक्य होणार आहे. सिडको महामंडळातर्फे 26 जानेवारी 2022 रोजी 5,730 घरांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला होता. या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वेगाने विकसित होणाऱ्या तळोजा नोडमध्ये 5,730 घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिकांकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

6508 घरं विक्रीसाठी उपलब्ध होणार

5730 घरांव्यतिरिक्त नवी मुंबईच्या द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोडमधील काही अतिरिक्त घरं या योजनेंतर्गत उपलब्ध करून देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. यामुळे सदर योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता द्रोणागिरी येथे 181, घणसोली येथे 12, कळंबोली येथे 48, खारघर येथे 129 आणि तळोजा येथे 1535, अशा एकूण 1905 घरं उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता द्रोणागिरी येथील 241, कळंबोली येथील 22, खारघर येथील 88 आणि तळोजा येथील 4252, अशा एकूण 4,603 घरं उपलब्ध आहेत. याप्रमाणे, एकूण 6,508 घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

ऑनलाईन प्रक्रिया

योजनेतील अर्ज नोंदणी ते सोडत या दरम्यानच्या सर्व प्रक्रिया या ऑनलाइन पद्धतीने पार पडणार असून याकरिता www.lottery.cidcoindia.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संकेतस्थळावर अर्जदारांना अर्ज नोंदणी, कागदपत्रे सादर करणे आणि अनामत रकमेचा भरणा करावयाचा आहे. तथापि, अर्जदारांना ठिकाण (नोड) निवडण्याचा पर्याय उपलब्ध असणार नाही. संगणकीय सोडत काढून वरीलपैकी कोणत्याही ठिकाणची घरं अर्जदारांना सिडकोकडून वाटप करण्यात येईल. पहिली सोडत पार पडल्यानंतर अ.जा./अ.ज./भ.ज./वि.ज. या वैधानिक आरक्षित प्रवर्गातील घरं शिल्लक राहिल्यास त्वरित दुसरी सोडत काढण्यात येऊन या घरांचे वाटप वैधानिक प्रवर्गांतील उर्वरित पात्र अर्जदारांना करण्यात येईल.

पत्रकार, दिव्यांग, माजी सैनिक, राज्य शासन कर्मचारी, नवी मुंबई प्रकल्पबाधित, माथाडी कामगार, धार्मिक अल्पसंख्य या प्रवर्गांकरिता आरक्षित सदनिका पहिल्या सोडतीनंतर शिल्लक राहिल्यास, दुसरी सोडत काढण्यात येऊन या सदनिकांचे वाटप या प्रवर्गांतील तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील उर्वरित पात्र अर्जदारांना करण्यात येईल.

गृहनिर्माण योजनेतील अन्य अटी व शर्ती कायम असून योजनेशी संबंधित सर्व प्रक्रिया या पूर्वनियोजित वेळापत्रकाप्रमाणेच पार पडतील, असे सिडकोकडून कळविण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या अतिरिक्त घरांचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घ्यावा असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या:

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक पुन्हा रखडणार, ठाकरे सरकारचा प्रस्ताव राज्यपालांनी परत पाठवला!

मिरची आता खिशालाही झोंबणार! हिरव्या मिरचीचा भाव तिप्पट वाढला, किरकोळ बाजारात किती दर?

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली