AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नवी मुंबईत टेस्टिंगवर भर, जुलै महिन्यात तब्बल 2 लाख 18 हजार चाचण्या

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन  प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिशन 'ब्रेक द चेन' अर्थात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी टेस्टिंगवर भर देण्यात आला आहे

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी नवी मुंबईत टेस्टिंगवर भर, जुलै महिन्यात तब्बल 2 लाख 18 हजार चाचण्या
corona test
| Edited By: | Updated on: Aug 02, 2021 | 12:00 PM
Share

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन  प्रभावी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मिशन ‘ब्रेक द चेन’ अर्थात कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी टेस्टिंगवर भर देण्यात आला आहे (Emphasis on corona testing in Navi Mumbai to prevent the third wave of corona 2 lakh 18 thousand tests did in July).

जुलै महिन्यात तब्बल 2 लाख 18 हजार चाचण्या

याअंतर्गत जुलै महिन्यात तब्बल 2 लाख 18 हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात 1 लाख 63 हजार 506 अँटिजेन तर 52 हजार 910 आरटी-पीसीआर टेस्टचा समावेश आहे. दिवसाला जवळपास 8 हजार नागरिकांचे टेस्टिंग करण्यात येत आहे. त्यानुसार आतापर्यंत 13 लाख 94 हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. सर्वात जास्त असणाऱ्या गर्दीचा ठिकाण एपीएमसीच्या पाची बाजारपेठ मध्ये दिवसात 2000 चाचण्या होत आहे. त्यानुसार दररोज संध्याकाळी संबंधित सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांशी वेबसंवादद्वारे चर्चा केली जात आहे. यात कोरोनाविषयीचा दैनंदिन आढावा घेतला जात आहे.

दैनंदिन वेबसंवादामधील चर्चेतील निरीक्षणानुसार रुग्ण आढळलेल्या इमारतीतील सर्व रहिवाशांची चाचणी केली जात आहे. गेल्या महिन्याभरापासून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. लक्षणे नसलेली परंतु कोविडची लागण झालेले रुग्ण कोरोनाचे वाहक ठरत आहेत. त्यांना रोखण्यासाठी टेस्टींग उपयुक्त ठरत असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट केले आहे.

दरम्यान, टेस्टिंग हे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी ठरत आहे. त्यामुळे रुग्ण आढळल्यास केल्या जाणाऱ्या टेस्टिंगला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

Emphasis on corona testing in Navi Mumbai to prevent the third wave of corona 2 lakh 18 thousand tests did in July

संबंधित बातम्या :

राज्यावर विविध संकटांचा डोंगर, मात्र पणनमंत्र्यांचा गर्दी करत रस्त्यावरच वाढदिवस

4 दिवसांत 22 हजार चाचण्या, पनवेलचा पॉझिटिव्हिटी रेट कमी, आयुक्तांच्या मोहिमेला यश

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.