Shocking : जेवणाच्या पैशांवरुन तुफान राडा, 17 जणांकडून जीवघेणा हल्ला! कामोठ्यातील धक्कादायक घटना

Kamothe Navi Mumbai Fight CCTV Video : जेवणाच्या पैशावरून दोन्ही कुटुंबात वाद झाला होता. हाच राग मनात धरून संदीप म्हात्रे आणि प्रविण म्हात्रेंसह 17 जणांनी कामोठ्यात लोखंडी रॉड, बांबूच्या साहाय्याने रात्रीच्या वेळेस हल्ला केला होता

Shocking : जेवणाच्या पैशांवरुन तुफान राडा, 17 जणांकडून जीवघेणा हल्ला! कामोठ्यातील धक्कादायक घटना
नवी मुंबईच्या कामोठ्यातील राडा सीसीटीव्हीमध्ये कैदImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 9:16 PM

नवी मुंबई : नवी मुंबईच्या कामोठ्यातून (Kamothe, Navi Mumbai) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 17 जणांनी मिळून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झालाय. जखमी तरुणावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लोखंडी रॉड आणि बांबूनं 17 जणांनी एकत्र येत या तरुणाला बेदम मारहाण (Huge Fight recorded in CCTV Video) केली. ज्या इमारतीच्या आवारात हा सगळा प्रकार घडला, तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली. या वेळी इमारतीतील लोकांमध्ये भीती पाहायला मिळाली. अचानक येऊन या तरुणावर नेमका कुणी हल्ला केला, हे कुणालाच काही कळायला मार्ग नव्हता. दरम्यान, मारहाणीच्या या घटनेवेळी काही लोकही जमा झाल्याचं दिसून आलं आहे. याप्रकरणी आता पोलिसात (Kamothe Police) तक्रार दाखल करण्यात आली आहे. हल्ला करणारे सर्वच्या सर्व हल्लेखोर 17 जण फरार असून त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय.

कशामुळे झाला राडा?

जेवणाच्या पैशांवरुन झालेल्या भांडणातून ही मारहाण करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामोठे परिसरात हा सगळा प्रकार घडला आहे. कामोठे पोलिसांनी आोपींबाबत गुन्हा दाखल करुन घेतले आहे. मात्र सर्वच्या सर्व 17 हल्लेखोर संशयित आरोपी ही फरार आहेत. त्यांच्या सध्या कसून शोध घेतला जातो आहे.

कधीची घटना?

मारहाणीची ही घटना 29 मार्च रोजी घडली. मंगळवार 29 मार्च रोजी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रशांत म्हात्रे या तरुणावर हा हल्ला करण्यात आला. म्हात्रे कुटुंबात 26 मार्च रोजी वाद झाला होता. जेवणाऱ्या पैशांवरुन जेजुरीत हा वाद झाला होता. हाच वाद टोकाला जाऊन त्याचे पडसाद 29 मार्च रोजी उमटलेत.

काय झालं होतं नेमकं?

म्हात्रे कुटुंब जेजुरीला गेले होते. म्हात्रे कुटुंबाचं कुलदैवत जेजुरीतील खंडोबा देवस्थान असून सगळे मिळून या ठिकाणी गेले होते. 150 जण एकत्र जेजुरीला गेलेले होते. दरम्यान, यावेळी जेवणाच्या पैशांवरुन दोन्ही कुटुंबात वाद झाला. याचा राग मनात ठेवून संदीप म्हात्रे आणि प्रवीण म्हात्रेंसह 17 जणांनी कामोठ्यात प्रशांत म्हात्रे यांच्यावर हल्ला केला. लोखंडी रॉड आणि बांबूनं प्रशांत म्हात्रे यांना बेदम मारहाण करण्यात आली. या संपूर्ण घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. सध्या याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

धक्कादायक ! प्रेयसीला अडकवण्यासाठी प्रियकराने रचला भयंकर कट, अंबरनाथमधील तरुणाच्या हत्येची उकल

Parali Morcha : नांदेडमधील संजय बियाणी हत्या प्रकरण, आरोपींच्या अटकेसाठी माहेश्वरी समाजाचा मूक मोर्चा

नातीवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुलाला आजीने पाठवले 25 वर्षे तुरुंगात; पोक्सो कोर्टाने दिला तीन महिन्यांत निकाल

महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी: पाहा Video

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.