खारघर, द्रोणागिरी, उलवे परिसरात पाणीकपात; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्याकरिता खारघर, द्रोणागिरी आणि उलवे येथे काही कालावधीसाठी आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा राहणार बंद असणार आहे. सिडको महामंडळाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

खारघर, द्रोणागिरी, उलवे परिसरात पाणीकपात; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार
CIDCO- water supply

नवी मुंबई : पाणी पुरवठा व्यवस्था सुधारण्याकरिता खारघर, द्रोणागिरी आणि उलवे येथे काही कालावधीसाठी आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा राहणार बंद असणार आहे. सिडको महामंडळाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

सिडको महामंडळाकडून खारघर, उलवे आणि द्रोणागिरी नोडमधील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था सुधारण्याकरिता हाती घेण्यात आलेल्या देखभालीच्या कामांसाठी दिनांक 19 सप्टेंबर 2021 पासून काही कालावधीसाठी दर आठवड्यातील ठराविक दिवशी संबंधित नोडमधील पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार आहे.

याबाबतचे वेळापत्रक सिडकोतर्फे जाहीर करण्यात आले असून, या वेळापत्रकानुसार द्रोणागिरी आणि मजीप्रा (जेएनपीटी) येथे दर रविवारी सकाळी 08.00 वाजेपासून ते सोमवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत, खारघर नोडमध्ये दर सोमवारी सकाळी 08.00 ते मंगळवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत, उलवे नोडमध्ये दर मंगळवारी सकाळी 08.00 वाजेपासून ते बुधवारी सकाळी 07.00 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येईल. याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करुन सिडकोस सहकार्य करावे, असे आवाहन सिडकोकडून करण्यात आले आहे.

संबंधिच बातम्या :

विशेष लसीकरण सत्राचा 98 दिव्यांगांनी घेतला लाभ, उद्या 100 केंद्रावर 37 हजारहून अधिक लसीकरणाचे नियोजन

मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त अन्नधान्यावर सेल 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI