AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल – शरद पवार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. गुरूवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर विरोधकांनी केंद्र सरकार तसेच भाजपावर आगपाखड केली. शरद पवार यांनीही या मुद्यावरून सरकारवर निशाणा साधला.

Sharad Pawar : भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल - शरद पवार
अरविंद केजरीवाल यांच्या अटकनेतर शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.
| Updated on: Mar 22, 2024 | 1:32 PM
Share

100 कोटींच्या कथित दारुविक्री घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास ईडीची टीम 10वं समन्स आणि सर्च वॉरंट घेऊन केजरीवाल यांच्या घरी पोहोचली. दोन तासांच्या चौकशीनंतर रात्री 9च्या सुमारास अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. मात्र केजरीवालांच्या अटकेनंतर ‘आप’तर्फे जोरदार निदर्शनं करण्यात आली. इंडिया आघाडीसह विरोधी पक्षांनीही केजरीवाल यांच्यावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवला.  केजरीवाल यांची अटक चुकीची आहे, असे सांगत शरद पवार यांनीही केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवला.

गुरूवारी संध्याकाळी ईडीच्या कारवाईनंतर देशभरात आपच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. विरोधी पक्षांनीही केजरीवाल यांना पाठिंबा दर्शवत त्यांच्याविरोधातील कारवाईचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनीही या मुद्यावरून केंद्र सरकार आणि भाजपावर कडाडून हल्ला चढवला. शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी केजरीवालांच्या अटकेचा निषेध नोंदवला. ‘मोदींच्या भूमिकेला विरोध केल्यानेच केजरीवालांवर कारवाई करण्यात आली ‘ असा आरोप शरद पवार यांनी केला. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.

केजरीवाल यांची अटक चुकीची

निवडणुकीच्या काळात भाजपकडून भीती पसरवण्याचे काम सुरू आहे. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली. आता अरविंद केजरीवाल यांना अटक केली, उद्या कोणाला अटक करतील माहिती नाही. केजरीवाल यांची अटक चुकीची आहे असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला.

भाजपकडून सत्तेचा गैरवापर

भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या काही प्रमुख नेत्यावर ईडीचा वापर करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना लक्ष्य केलं जात आहे. ज्या राज्यात ज्या नेत्यांचा प्रभाव आहे त्यांना तुरूंगात टाकण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे. याआधी राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. राज्यात धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या राज्याच्या प्रमुखाला अटक करणं ही चुकीची गोष्ट आहे, असंही शरद पवार म्हणाले.

भाजपला किंमत मोजावी लागेल

केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळेच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.