AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिरीशभाऊ दारू पीत नाही, तंबाखू खात नाही, पण त्यांना एकच सवय ती म्हणजे…, गिरीश महाजन यांच्यावर एकनाथ खडसे यांचा मोठा हल्ला

गिरीश महाजन हा माणूस नुसते बडबड करणारा आहे. देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून मोठा झालेला आहे. त्यांचे स्वतःचे कर्तृत्व नाही. त्यामुळे गिरीश महाजन यांना भाव देण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरोधात षडयंत्र रचले होते.

गिरीशभाऊ दारू पीत नाही, तंबाखू खात नाही, पण त्यांना एकच सवय ती म्हणजे..., गिरीश महाजन यांच्यावर एकनाथ खडसे यांचा मोठा हल्ला
एकनाथ खडसे गिरीश महाजन
| Updated on: Sep 28, 2024 | 1:34 PM
Share

जळगाव जिल्ह्यातील दोन नेत्यांमधील वाद राज्यभर गाजत असतो. आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. गेल्या दोन, तीन दिवसांपासून या नेत्यांमधील वाद रंगला आहे. आता एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर घणाघाती हल्ला केला आहे. खडसे म्हणाले, मी हे मान्य करतो की गिरीशभाऊ दारू पीत नाही. तंबाखू खात नाही. बिडी पीत नाही. त्यांना कुठलीही सवय नाही. मात्र त्यांना एक सवय आहे. त्यांची ती सवय सर्वांना माहीत आहे. त्यावर मी न बोललेले बरं…एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर गिरीश महाजन यांच्या त्या सवयीवर चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे

गिरीश महाजन हा माणूस नुसते बडबड करणारा आहे. देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून मोठा झालेला आहे. त्यांचे स्वतःचे कर्तृत्व नाही. त्यामुळे गिरीश महाजन यांना भाव देण्यात काहीच अर्थ नाही. त्यांनी मला बदनाम करण्यासाठी माझ्याविरोधात षडयंत्र रचले होते. त्या सर्व प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार कोण आहे? हे महाराष्ट्राला माहिती आहे. ते म्हणतात, भोसरी भूखंडात खडसेंनी भूखंड घेतला. परंतु आजही तुम्ही भोसरीचा उतारा काढू शकता मूळ मालकाचे नावच त्यावर दिसेल. मी महसूल मंत्री होतो. त्यामुळे मला तेवढी अक्कल होती. गिरीश महाजन यांनी भूखंडासंदर्भात दिलेली माहिती अत्यंत चुकीची आहे.

विचारा तुमच्या आमदाराला?

आता म्हणता बोदवडमध्ये पाणी नाही. ती जबाबदारी तुमच्या आमदाराची आहे. काय करतोय तुमचा काय करतो आमदार? असा प्रश्न उपस्थित करणात आमदार चंद्रकांत पाटील यांना एकनाथ खडसे यांनी घेरले. तुमच्या आमदारानेच बोदवडमध्ये पाणी दिले नाही. ते म्हणतात, कोथळी ग्रामपंचायतीचा सरपंच तुमचा नाही. तर घ्या त्या सरपंचाची प्रतिक्रिया अन् विचारा त्यांना कुणाचा सरपंच आहे, असे एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना सुनावले.

तुम्ही म्हणता माझ्या बायकोला हरवले. तुम्ही गद्दारी करून हरवले आहे. बोदवड आणि मुक्ताईनगरनगर पंचायत ही माझी होती. परंतु तुम्ही फोडाफोडीचे राजकारण केले. पैशांचे आमिष देऊन त्या संस्था ताब्यात घेतल्या, असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. आमच्या बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत एक सुद्धा माणूस तुमचा निवडून आला नाही. मी काय काम केले असे प्रश्न ते विचारतात. तर जे धरणाचे काम उभे केले ते मी केले आहे. तुमच्या मतदारसंघातले धरण 100% नाथाभाऊंच्या कालखंडात झाले आहे. तुम्ही पाटबंधारे मंत्री होता तेव्हा काय दिवे तुम्ही लावले? असा प्रश्न एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना सुनावला.

आमची जामनेरची सभा तुम्ही पाहिली. त्यामुळे तुमचं मानसिक संतुलन बिघडलेला आहे. त्या उलट तुम्ही माझी नार्को टेस्ट संदर्भात बोलतात. त्याची काय गरज आहे? असा प्रश्न खडसे यांनी उपस्थित केला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.