AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, आज राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे पेट्रोल दरवाढीविरोधात आज चूल मांडा आंदोलन केला जाणार आहे. (ncp protest petrol diesel gas)

गॅस, इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, आज राज्यभर 'चूल मांडा' आंदोलन
| Updated on: Feb 28, 2021 | 7:08 AM
Share

मुंबई : गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडत असल्यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. काही शहरांत पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केल्यामुळे सामान्य वर्गातील अनेकांना खासगी वाहनाने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. गॅस सिलिंडरच्या किमतींमध्येही सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे. राष्ट्रवादी (NCP) महिला काँग्रेसतर्फे पेट्रोल दरवाढीविरोधात आज चूल मांडा आंदोलन केला जाणार आहे. (NCP protest against the price increase of petrol diesel and gas)

राज्यातील ज्या-ज्या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहिरात असेल, त्या सर्व पेट्रोल पंपांवर राष्ट्रवादीतर्फे हे आंदोलन केले जाईल. आज सकाळी 11 वाजता या आंदोलनाची सुरुवात होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

राज्यात तसेच देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक शहरांत पेट्रोलने शंभरी पार केल्यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. कित्येकांना स्व:तच्या खासगी वाहनाने प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. मागील काही दिवसांपासून गॅस सिलिंडरचे भावही दिवसेंदिवस वाढत आहेत. फक्त फेब्रुवारीमध्ये तीन वेळा गॅसचे भाव वाढल्यामुळे गृहिणी त्रस्त आहेत. परिणामी नागरिकांकडून केंद्र सरकारविरोधात रोष व्यक्त केला जातोय. याच कारणामुळे राष्ट्रावादीने आज राज्यभरात चूल मांडा आंदोलनाचे आयोजन केले आहे. आज सकाळी 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल.

आंदोलनाचे स्वरुप काय?

राष्ट्रवादी महिला काँग्रसेतर्फे राज्यभरात चूल मांडा आंदोलन केले जाणार आहे. राज्यात ज्या-ज्या पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बॅनर लावलेले असेल किंवा जाहिरात झळकत असेल, त्या-त्या पेट्रोल पंपावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे बॅनर किंवा फलकाखाली दगडाची किंवा विटांची चूल ठेवली जाईल. यावेळी आंदोलकांकडून गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ हे प्रतिकात्मक आंदोलन केले जाईल.

दरम्यान, चूल मांडा आंदोलन राज्यभरात केले जाणार असून रुपालीताई चाकणकर या आंदोलनात पुण्यातून सहभागी होतील. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या तसेच सर्वसामान्य गृहिणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून चूल मांडा आंदोलनात सहभागी होणार असल्याचे रुपालीताई चाकणकर यांनी सांगितले आहे.

इतर बातम्या :

Youtube Star Shanmukh Jaswanth : प्रसिद्ध यूट्यूब स्टारची दारुच्या नशेत तीन कारला धडक, पोलिसांकडून अटक

VIDEO : 75 लाखांची बाईक घेऊन भाजी खरेदीला, लोक पाहातच राहिले

संजय राठोड यांचं मंत्रिपद राहणार की जाणार?, शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक; मोठ्या निर्णयाची शक्यता

(NCP protest against the price increase of petrol diesel and gas)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.