कुडाळमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, राणेंच्या बंगल्यावर शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपप्रवेश

कणकवलीत नारायण राणे यांच्या ओमगणेश बंगल्यावर पक्षप्रवेश सोहळा झाला (Kudal Malvan NCP Volunteers join BJP)

  • विनायक वंजारे, टीव्ही 9 मराठी, सिंधुदुर्ग
  • Published On - 16:24 PM, 25 Feb 2021
कुडाळमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, राणेंच्या बंगल्यावर शेकडो पदाधिकाऱ्यांचा भाजपप्रवेश
कुडाळमधील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपप्रवेश

सिंधुदुर्ग : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो पदाधिकारी-कार्यकत्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. भाजप खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. राज्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धडाका सुरु असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र खिंडार पडल्याचं चित्र आहे. (Kudal Malvan NCP Volunteers join BJP)

नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का

कणकवलीत नारायण राणे यांच्या ओमगणेश बंगल्यावर पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी आमदार नितेश राणे, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली उपस्थित होते. कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

कोणाकोणाचा भाजप प्रवेश?

राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन तेंडुलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवक, पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

वैभव नाईकांनाही दिलेला धक्का

कुडाळ पंचायत समितीच्या सभापती नूतन आईर यांनी ऑक्टोबर महिन्यात नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपमधे प्रवेश केला होता. त्यामुळे कुडाळ पंचायत समितीत भाजपची सत्ता आली. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघात शिवसेनेला धक्का देत राणेंनी कुडाळच्या सभापतींना भाजपात आणलं होतं.

तर, कुडाळ पंचायत समितीच्या सभापतींच्या दालनात त्यांचे पती ठेकेदारी चालवत होते. हे आपल्या कानावर आल्यानंतर आपण सभापतींना असले धंदे शिवसेनेत चालणार नाहीत, राजीनामा द्या, असे सांगितले होते. त्याचा राग आल्यामुळे त्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला, असा दावा वैभव नाईक यांनी केला होता.

संबंधित बातम्या :

वैभव नाईकांच्या मतदारसंघात शिवसेनेला सुरुंग, नितेश राणेंच्या उपस्थितीत कुडाळच्या सभापती भाजपात

“नितेश राणेंना खासगीत विचारा…” कुडाळ सभापतींच्या भाजपप्रवेशानंतर वैभव नाईकांचे प्रत्युत्तर

(Kudal Malvan NCP Volunteers join BJP)