पुष्पक एक्सप्रेस दरोडा, बलात्कार प्रकरण : नीलम गोऱ्हेंचं गृहमंत्र्यांना पत्र, आरोपींना कठोर शिक्षेची मागणी

विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी रेल्वे सुरक्षेबाबत महत्वाच्या मागण्या केल्या आहेत.

पुष्पक एक्सप्रेस दरोडा, बलात्कार प्रकरण : नीलम गोऱ्हेंचं गृहमंत्र्यांना पत्र, आरोपींना कठोर शिक्षेची मागणी
Neelam Gorhe, Deputy Speaker, Legislative Council
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 3:48 PM

पुणे : पुष्पक एक्सप्रेसमध्ये दरोडा टाकून महिलेवरील बलात्कार प्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी आठ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. इगतपूरी ते कसारा दरम्यान पुष्कक एक्सप्रेसमध्ये ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी रेल्वे सुरक्षेबाबत महत्वाच्या मागण्या केल्या आहेत. (Neelam Gorhe demands stern punishment for Pushpak Express robbery and rape accused)

8 ऑक्टोबरच्या रात्री साडेसात वाजता लखनऊ सीएसटी पुष्पक एक्सप्रेसमध्ये डी टू या बोगीत दरोडा टाकण्यात आला. आठ दरोडेखोरांनी 16 प्रवाशांना मारहाण करुन त्यांच्याकडील मोबाईल रोकड लूटली होती. मारहाणीत सहा प्रवासी जखमी झाले होते. नऊ प्रवाशांचे मोबाईल आणि सहा प्रवाशांची रोकड आणि एका महिलेवर दोन आरोपींनी लैगिंक अत्याचार केला होता. या प्रकरणी नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहिलं आहे. रेल्वेतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी त्यांनी केलीय. तसंच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी गोऱ्हे यांनी पत्राद्वारे केलीय.

पोलिसांनी तपास कसा केला?

हा दरोडा सुनियोजित नसला तरी आरोपी हे सराईत गुन्हेगार मानसिकतेचे असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. कसारा रेल्वे स्टेशनच्या आधी आरोपींपैकी एकाने गाडीची साखळी खेचली. यावेळी तीन आरोपी पळून गेले. उर्वरीत पाच पैकी तीन कसारा स्टेशऩ आल्यावर उतरले. उर्वरीत दोन आरोपींना प्रवाशांनी पकडून ठेवले. कल्याण जीआरपी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. या दोन आारोपींकडून पोलिसांनी माहिती घेतली आणि तपास सुरु केला.

मध्य रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालीद, उपायुक्त मनोज पाटील, वरिष्ठ पोलिस निरिक्षक वाल्मीक शादरूल, पोलीस निरीक्षक पांढरी कांदे मध्ये पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांचे तीन पथके आणि कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी तपास सुरु केला. या गुन्ह्यातील आरोपी अरशद शेख, प्रकाश पारधी, अर्जुन परदेशी, किशोर सोनवणे, काशीनाथ तेलंग, आकाश शेनोरे, धनंजय भगत आणि राहूल आडोळे या आठही आरोपींनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

आरोपी इगतपुरीत गाडीत शिरले, कसाऱ्यात गाडीतून उतरले

आठ पैकी सात आरोपी हे नाशिक येथील घोटी टाके येथील आहेत. एक आरोपी मुंबईचा आहे. आकाश शेनोरे या सर्वांचा म्होरक्या आहे. सर्व आरोपींनी घोटी येथे मद्यपान केले. नंतर इगतपूरी रेल्वे स्टेशन येथे मद्यपान केले. तसेच गांजा ओढला होता. ते इगतपूरी येथे पुष्पक एक्सप्रेसमध्ये चढले. त्यांनी दरोड्याचे काही प्लॅनिंग केले नव्हते. पण सर्व आरेोपी हे गुन्हेगारी मानसिकतेचे आणि सराईत असल्याची माहिती समोर आली आहे.

इतर बातम्या :

Maharashtra Band : ठाण्यात उपमहापौरांच्या पतीची रिक्षाचालकांना मारहाण! व्हिडीओ उजेडात

सुप्रियाताईंचा सूर आणि दिशादर्शन चुकीचं; संजय राऊतांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरावं, शेलारांची टोलेबाजी

Neelam Gorhe demands stern punishment for Pushpak Express robbery and rape accused

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....