AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुषमा अंधारे यांच्याकडून नव्या नात्याची जुळवणी? नवनीत राणा ‘अक्का’, श्रीकांत शिंदे ‘भाचा’

नवनीत 'अक्का' हनुमान चालीसा बद्दल लोकसभेत बोलल्या. त्यानंतर माझ्या भाच्याने सर्व हनुमान चालीसा म्हणून दाखवली. हनुमानाबद्दल श्रद्धा आहे तर

सुषमा अंधारे यांच्याकडून नव्या नात्याची जुळवणी? नवनीत राणा 'अक्का', श्रीकांत शिंदे 'भाचा'
SUSHAMA ANDHARE WITH NAVNEET RANA AND SHRIKANT SHINDE Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Aug 15, 2023 | 10:33 PM
Share

अमरावती : 15 ऑगस्ट 2023 । हनुमान चालीसा पठणावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी थेट आव्हान दिले होते. अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या बालेकिल्याला नवनीत राणा यांनी हादरा दिला होता. अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा अमरावतीमधून पुढील उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याला शिवसेना उपनेत्या ( उद्धव ठाकरे गट ) यांनी थेट उत्तर दिले आहे. तर, नवनीत राणा यांना ‘अक्का’ आणि श्रीकांत शिंदे यांना ‘भाचा’ म्हणत नव्या नात्याची जुळवणीही केली आहे.

शरद पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे तरी संभ्रम निर्माण होत असतोच. काका पुतण्यांची कौटुंबिक भेट समजू शकतो पण त्या भेटीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जातात त्यामुळे संभ्रम निर्माण होतो. वर नेते एकमेकांशी भांडतात आणि खाली कार्यकर्ते एकमेकांचे डोके फोडतात. पक्षाचे कार्यालय ताब्यात कार्यकर्ते भांडत आहे. त्यांच्यात संभ्रम निर्माण होत आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील संभ्रमाची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे पक्ष मिळून आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी संभ्रमाची स्थिती निर्माण करू नये, असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

आज फेकम फेक भाषण ऐकलं नाही

भाजप हे राजकारणासाठी धर्माचा वापर करतात. हनुमान चालीसा म्हटल्याने भारतातील किती प्रश्न सुटले? हनुमान चालीसा म्हटल्याने समृद्धी महामार्गावरील जीव परत येत असतील तर आम्हाला मान्य आहे. तिकडे हनुमान चालीसा म्हणतात आणि इकडे मुख्यमंत्री यांच्या जिल्ह्यातील रुग्णालयात लोकांचा मृत्यू होतो. सरकारला प्रश्न विचारले की त्याला देशद्रोही ठरवले जाते. आज पहिला स्वतंत्र दिवस असेल की आज सकाळी आपण फेकम फेक भाषण ऐकलं नाही असा टोला त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लगावला.

आमच्या इथल्या खासदार नवनीत राणा रडून रडून सांगतात की मला अटक केली. हनुमान चालीसा जर तुमच्या घरात म्हटली असती तर कोणी आत टाकलं असतं? आमच्या रश्मी वहिनींना येतो म्हणाल्या असत्या तर त्यांनी नारळ देऊन स्वागत केलं असतं. पण, यांना हनुमान चालीसा म्हणता येत नाही. गणपती विसर्जन करता येत नाही. मतदारसंघामधील प्रश्नांसाठी नवनीत राणा यांना वेळ नाही, अशी टीका त्यांनी केली.

नवनीत ‘अक्का’ आणि श्रीकांत शिंदे ‘भाचा’

नवनीत राणा या हनुमान चालीसेच्या जास्त प्रेमात पडलेल्या आहे. आम्ही फक्त त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की अमरावती जिल्ह्यात शकुंतला रेल्वे, संत्रा प्रक्रिया केंद्र यासह जिल्ह्यात अनेक मुद्दे आहे. परंतु, हनुमान चालीसा किंवा कुठलाही ग्रंथ, श्लोक, अभंग, कुराण पाठ असणे हे खासदार असण्याचे शिक्षण असू शकत नाही. खासदार होण्यासाठी आणि लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी तिथल्या जनमानसाचे प्रश्न माहीत असणे गरजेचे आहे. नवनीत ‘अक्का’ हनुमान चालीसा बद्दल लोकसभेत बोलल्या. त्यानंतर माझ्या भाच्याने सर्व हनुमान चालीसा म्हणून दाखवली. हनुमानाबद्दल श्रद्धा आहे तर हनुमान चालीसा घरी म्हणा, अडवलं कुणी असेही त्या म्हणाल्या.

शिवसेनेचा उमेदवार कोण?

अमरावती लोकसभा मतदारसंघ मागायचा अधिकार काँग्रेसला आहे, राष्ट्रवादीला आहे. शिवसेनेलाही आहे. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने मतदारसंघात तयारी करत आहे. पण इथे जागा कोणाला द्यायची हा पक्ष नेतृत्वाचा प्रश्न असेल. अमरावती लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अनेक उमेदवार इच्छुक आहेत. कोणीतरी चुकीच्या बातम्या दिल्या की मी अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढणार आहे. पण, मी अमरावतीत निवडणूक लढणार नाही. अमरावतीमध्ये आम्हाला पोषक वातावरण आहे म्हणून अमरावतीचा दौरा करत आहे. बाकी उमेदवार कोण असेल ते नंतर बघू. अमरावतीमध्ये आम्ही फार जातीने लक्ष घालतोय असेही त्यांनी सांगितले.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.