ठाकरे सरकार म्हणजे नुसते बोलबच्चन, मंत्रालयही दिल्लीत हलवा; निलेश राणेंची टीका

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून त्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

ठाकरे सरकार म्हणजे नुसते बोलबच्चन, मंत्रालयही दिल्लीत हलवा; निलेश राणेंची टीका

मुंबई: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं असून त्यांना अद्यापही मदत न मिळाल्याने त्यावर भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर मंत्रालयही दिल्लीला हलवा, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे. (nilesh rane slams cm uddhav thackerays farmers package aid)

निलेश राणे यांनी ट्विटवरून ही टीका केली आहे. ठाकरे सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कढी. नुसतं बोलबच्चन. पंचनामे झाले आता पुढे काय?? आम्ही शेतकऱ्यांसाठी कर्ज काढू सांगणारे ठाकरे सरकारचे मंत्री कुठे गेले? प्रत्येक वेळेला केंद्राकडे बोट दाखवायचं असेल तर मंत्रालय पण दिल्लीला हलवा, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून राज्यातील अनेक मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दहा हजार कोटीचं पॅकेजही जाहीर केलं होतं. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा दावा निलेश राणे यांनी केला असून त्यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. (nilesh rane slams cm uddhav thackerays farmers package aid)

राज्य सरकारचं नुकसानग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज

1. शेतीपिकासाठी : जिरायत व बागायत क्षेत्रासाठी 10 हजार प्रतिहेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येईल)

2. फळपिकांसाठी : फळपिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रतिहेक्टर (2 हेक्टरच्या मर्यादेत मदत करम्यात येईल)

3. मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी भरीव मदत देण्यात येईल

4. रस्ते पूल – 2635 कोटी

5. नगर विकास – 300 कोटी

6. महावितरण उर्जा – 239 कोटी

7. जलसंपदा – 102 कोटी

8. ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा – 1000 कोटी

9. कृषी शेती घरांसाठी – 5500 कोटी

 

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

“नितेश राणेंना खासगीत विचारा…” कुडाळ सभापतींच्या भाजपप्रवेशानंतर वैभव नाईकांचे प्रत्युत्तर

(nilesh rane slams cm uddhav thackerays farmers package aid)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *