AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीता अंबानींचा मराठी बोलतानाचा व्हिडीओ पाहिलात का? महाराष्ट्रावर गरळ ओकणाऱ्या दुबेंना चपराक?

सध्या सोशल मीडियावर नीता अंबानी यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्या मराठीमध्ये बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

नीता अंबानींचा मराठी बोलतानाचा व्हिडीओ पाहिलात का? महाराष्ट्रावर गरळ ओकणाऱ्या दुबेंना चपराक?
Neeta AmbaniImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jul 11, 2025 | 4:19 PM
Share

महाराष्ट्रात मराठीच्या सक्तीवरुन भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाला होता. इतकंच नाहीतर त्यांनी ठाकरे बंधूंवर देखील निशाणा साधला आहे. दुबे यांनी मुकेश अंबानी यांना मारहाण करणार का? असा प्रश्न उपस्थित केला होता. मुकेश अंबानी आणि एसबीआयचे अध्यक्ष, जे मराठी बोलत नाहीत, ते मुंबईत राहतात, त्यांच्यावर काही बोलण्याची हिंमत आहे का? असे निशिकांत दुबे म्हणाले होते. त्यानंतर आता सोशल मीडियावर नीता अंबानी यांचा मराठीमध्ये बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडीओ?

नीता अंबानी यांच्या नीता अंबानी कल्चरल सेंटरला एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने त्यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांनी मराठीमध्ये वक्तव्य केले आहे. त्यांचा मराठी बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये संगीतकार अजय अतुल यांचं सुद्धा कौतुक करताना दिसून येत आहेत. त्यामुळे मराठीवरून अंबनी कुटुंबाला वादात ओढणाऱ्या निशिकांत दुबे यांना चपराक आहे.

वाचा: पाच वर्षात 13 पटींनी संपत्ती वाढवणारे मंत्री संजय शिरसाट किती कोटींचे मालक?

काय म्हणाल्या नीता अंबानी?

नमस्कार मंडळी कसे आहात? जय श्री कृष्ण, एनएमसीसीमध्ये आलेल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. एक वर्ष संपलं पण आणि किती छान वर्ष होतं. आपल्या देशाचे, संस्कृतीचे नाव संपूर्ण जगात उज्ज्वल करेल. तुम्ही आहात म्हणून आज संपूर्ण कला जीवंत आहे आणि तुम्हा आहात म्हणून नीता मुकेश अंबानी कल्चर सेंटर आहे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. आमचे सौभाग्य आहे की तुम्ही आमचे रसिक प्रेक्षक आहात‘, असे नीता अंबानी व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

काय म्हणाले होते दुबे?

तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? टाटा, बिर्ला, रिलायन्सचे महाराष्ट्रात युनिट नाहीत. टाटांनी त्यांचा पहिला कारखाना बिहारमध्ये बांधला. तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात, तुम्ही कोणता कर भरता? तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत, आमच्याकडे खाणी आहेत. झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशात आहेत, तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत?” असा सवाल निशिकांत दुबेंनी केला होता. “जर तुमच्यात हिंम्मत असेल, तर उर्दू भाषिकांना, तेलगू-तमिळ भाषिकांनाही मारहाण करा. तरच आम्ही समजू की खरंच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस आहात आणि त्यांच्याच विचारांवर ते चालतात” असंही दुबे म्हणाले होते. “राज ठाकरेंमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन दाखवावं, उचलून, उचलून आपटू” अशा पद्धतीची भाषा निशिकांत दुबे यांनी वापरली होती.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.