Breaking | नितीन गडकरी यांना धमकी प्रकरणी ‘ती’ मुलगी ताब्यात, नागपूर पोलीस कर्नाटकच्या दिशेने रवाना

Nitin Gadkari Threat Case : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात धमकीचे फोन केल्या प्रकरणी एका मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Breaking | नितीन गडकरी यांना धमकी प्रकरणी 'ती' मुलगी ताब्यात, नागपूर पोलीस कर्नाटकच्या दिशेने रवाना
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 5:06 PM

नागपूर : नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी तसेच 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी (Karnataka Police) एका मुलीला ताब्यात घेतलं आहे. कर्नाटक राज्यातील मंगळुरू (Mangalore) पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आता नागपूर पोलीस या मुलीला ताब्यात घेण्यासाठी कर्नाटकच्या दिशेने रवाना झाले आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात मंगळवारी धमकीचे फोन आले. मागील अडीच महिन्यात सलग दुसऱ्यांदा गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने नागपूरसह महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. मंगळवारी नागपूरमधील ऑरेंज सिटी जवळील गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात तीन वेळा कॉल आले. तसेच 10 कोटी रुपयांची खंडणीही मागण्यात आली. कॉल करणाऱ्याने स्वतःचं नाव जयेश पुजारी सांगितलं होतं.

मुलीचं नाव काय?

नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आलेल्या फोनवर कॉल करणाऱ्याने स्वतःचं नाव जयेश पुजारी असं सांगितलं होतं. हा कॉलर सध्या बेळगावात आहे. पण बेळगावातून आलेल्या कॉलचे मंगळुरू कनेक्शन समोर आले आहे. कॉलरने खंडणी भरण्यासाठी एका मुलीचा नंबर दिला होता. त्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. रझिया असं या मुलीचं नाव आहे. ती सध्या कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात आहेत. पुढील काही वेळात नागपूर पोलीस कर्नाटकात पोहोचतील.

रझियाचा जबाब काय?

कर्नाटक पोलिसांनी रझियाला ताब्यात घेतल्यानंतर तिची चौकशी केली. धमकी देणाऱ्या इसमाने आधी रझियाला फोन केला होता. एका कामासाठी तुझा नंबर देतोय, असं सांगितलं होतं. सदर इसमाने त्याचं नाव जयेश पुजारी सांगितलं होतं, अशी माहिती रझियाने दिली आहे. नितीन गडकरी यांच्या ऑफिसमध्ये धमकी देण्यासाठी आलेला फोन बेळगावातूनच होता तसेच रझियाला आलेला फोनदेखील बेळगावच्या जेलमधूनच होता, हेसुद्धा पोलिस चौकशीतून स्पष्ट झालं आहे.

रझिया मंगळुरूच्या रुग्णालयात अॅडमिट

नितीन गडकरी यांना धमकी प्रकरणात रझिया नावाच्या मुलाचा नवा ट्विस्ट आलाय. धमकीचं हे प्रकरण स्पष्ट होण्यासाठी रझियाची चौकशी सुरु आहे. रझिया सध्या मंगळुरू येथील एका रुग्णालयात अॅडमिट आहे. स्थानिक पोलीस तिची चौकशी करत आहेत.

बेळगाव आणि मंगळुरूचं कनेक्शन काय?

नितीन गडकरी यांच्या ऑफिसमध्ये खंडणी आणि धमकीसाठीचे हे फोन मंगळवारी आले होते. गूगल पे द्वारे १० कोटी रुपयांची रक्कम भरण्यास सांगण्यात आले. सदर इसमाने त्यासाठी रझियाचा नंबर दिला तर स्वतःचे नाव जयेश पुजारी सांगितले होते. हा फोन बंगळुरूतील जेलमधून करण्यात आल्याचं उघड झालं आहे. मात्र रझिया आधीपासूनच मंगळुरू येथील रुग्णालयात अॅडमिट आहे. त्यामुळे बेळगाव आणि मंगळुरूचं नेमकं काय कनेक्शन आहे, हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

कोण आहे रझिया?

पोलिसांनी अद्याप केलेल्या चौकशीनुसार, रझिया ही एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. ती इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स करते. रझियाचा बॉयफ्रेंड बेळगावच्या जेलमध्ये आहे. रझियाचा बॉयफ्रेंड आणि जयेश पुजारी याची मैत्री झाली आहे. रझियाच्या बॉय फ्रेंडने जयेशच्या मोबाइलवरून तिच्याशी संपर्क साधला होता. तिथूनच रझियाचा नंबर जयेश पुजारीकडे गेला.

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.