शिवसेना शिंदे गटातून आताची सर्वात मोठी बातमी; तरच उपमुख्यमंत्रिपद स्विकारेल, एकनाथ शिंदेंची नवी मागणी काय?

शिवसेना शिंदे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून समोर आलेल्या या माहितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शिवसेना शिंदे गटातून आताची सर्वात मोठी बातमी; तरच उपमुख्यमंत्रिपद स्विकारेल, एकनाथ शिंदेंची नवी मागणी काय?
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 5:18 PM

राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे, मात्र अजूनही नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात यालेली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार येत्या 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. मात्र त्यापूर्वी शिवसेना शिंदे गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदावर अडून बसले आहेत. गृहमंत्रिपद मिळालं तरच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार आहेत, अन्यथा उपमुख्यमंत्रिपद हे शिवसेना शिंदे गटातील दुसऱ्या एखाद्या वरिष्ठ नेत्याला मिळण्याची शक्यता आहे.

शिंदे गटाच्या वाट्याला किती मंत्रिपदं? 

समोर आलेल्या माहितीनुसार येत्या पाच 5 डिसेंबर रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. मात्र त्यापूर्वी महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे हे त्यांच्या साताऱ्यातील दरे या गावी रवाना झाले आहेत. पुढील दोन दिवस महायुतीच्या कोणत्याही बैठका होणार नाहीयेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला बारा ते तेरा मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. मात्र एकनाथ शिंदे हे गृहखात्यावर अडून बसले आहेत. गृहखातं मिळालं तरच ते उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार असल्याची माहिती समोर येत आहे. अन्यथा उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेथील एखाद्या दुसऱ्या वरिष्ट नेत्याला मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे भाजप देखील गृहखात्यासाठी अग्रही आहे, भाजप देखील गृहखातं सोडण्यास तयार नाही, त्यामुळे अशा स्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना गृहखातं मिळणार का? नाही मिळाल्यास उपमुख्यमंत्रिपद शिवसेनेच्या कोणत्या वरिष्ठ नेत्याला मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महायुतीला स्पष्ट बहुमत 

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 132 जागा जिंकून भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. तसेच भाजपला आठ अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा दिला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे 57 उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे राज्यात आता भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं मानलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला आहे, मात्र ते गृहमंत्रिपदासाठी अडून बसल्याची माहिती आता समोर येत आहे.

राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले.
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले.
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.