कुणबी विरोधक असल्याचा जोरदार अप्रपचार; विजय वडेट्टीवार समर्थकांचं सडेतोड उत्तर काय?
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे कुणबी विरोधी असल्याचा अपप्रचार सुरू आहे. त्यावरून सोशल मीडियात वार सुरू झालं आहे. वडेट्टीवार समर्थकांनीही वडेट्टीवार हे कुणबी विरोधक नसल्याच्या पोस्ट व्हायरल करायला सुरुवात केली आहे. वडेट्टीवार समर्थकांनी 2019 चंद्रपूर लोकसभा निवडणुकीतील तत्कालीन उमेदवार बाळू धानोरकर यांच्या प्रचारांच्या वडेट्टीवार यांच्या सभांचे व्हिडीओ व्हायरल केले आहेत. धानोरकर हे कुणबी होते. त्यांच्यासाठी प्रचार करणारे वडेट्टीवार कुणबी विरोधक कसे? असा सवाल या पोस्टमधून केला जात आहे.

लोकसभा निडवणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे कुणबी विरोधी असल्याचा अपप्रचार सुरू झाला आहे. मात्र, विजय वडेट्टीवार यांनी टीकाकारांना जशास तसे उत्तर दिलंय. मी जर कुणबी विरोधी असतो तर बाळू धानोरकर यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले असते का? असा सवाल विजय वडेट्टीवार समर्थकांनी सोशल मीडियातून केला आहे. तसेच आपणच धानोरकर यांना तिकीट मिळवून दिलंय, मग मी कुणबीविरोधी कसा? असा सवालही वडेट्टीवार समर्थकांनी केला आहे. 2019च्या निवडणुकीत विजय वडेट्टीवार हे बाळू धानोरकर यांना विजयी करण्याचं आवाहन करतानाचा आणि वडेट्टीवार यांच्यामुळे तिकीट मिळाल्याचं सांगतानाचा धानोरकर यांचाही व्हिडीओ व्हायरल होत असल्याने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर मिळालं आहे.
व्हिडिओत काय ?
2019च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. चंद्रपूर येथील या सभेला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते. राहुल गांधी यांच्यासमोरच धानोरकर यांना निवडून आणण्याचं वचन वडेट्टीवार देताना दिसत आहे. बाळू भाऊला आपण विजयी करणार आहोत, ही सीट आपण जिंकून आणू, असा निर्धार करा. हात वर करून राहुल गांधींना तसा विश्वास द्या. 15 वर्षापासून या जागेवर खासदार नव्हता. राहुल जी तुम्ही तिकीट दिलं. आम्ही विश्वास देतो. आम्ही बाळू धानोरकर यांना मोठ्या मतांनी विजयी करू, असं विजय वडेट्टीवार या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. हंसराज तेरा राज खतम हो गया है. बाळू भाऊ का राज शुरू हो रहा है. चायवाल्याने देश बरबाद केला. दूधवाल्याने चंद्रपूर बरबाद केला, अशी टीकाही ते हंसराज अहिर यांच्यावर करताना दिसत आहेत.
धानोरकर काय म्हणाले?
2019च्या लोकसभा निवडणुकीतील बाळू धानोरकर यांचा एक बाईटही व्हायरल होत आहे. त्यात धानोकर हे विजय वडेट्टीवार यांच्यामुळेच तिकीट मिळाल्याचं सांगताना दिसत आहेत. शरद पवार, विज वडेट्टीवार, शिवाजीराव मोघे, ख्वाजा बेग हे सर्व नेते मागे उभे राहिले. बाळू धानुरकर यांच्यात इलेक्टिव्ह मेरीट आहे. त्यांना तिकीट द्या. ते विजयी होतील, असं या नेत्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं, असं बाळू धानोरकर बोलताना दिसत आहेत.
तर प्रचार केला असता का?
2019 चंद्रपूर लोकसभा निवडणुकीचा हा व्हिडिओ बघा. चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांना निवडून आणणार हे वचन विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधी यांना दिले होते. धानोरकर हे कुणबी समाजातील उमेदवार होतेय. त्यांना उमेदवारी मिळावी म्हणून विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला होता आणि त्यांच्यासाठी 50 हुन अधिक सभा घेतल्या होत्या. आणि आज वडेट्टीवार कुणबी विरोधक आहेत म्हणून प्रचार सुरू आहे? वडेट्टीवार कुणबी विरोधक असते तर त्यांनी धानोरकर यांच्यासाठी एवढा प्रचार केला असता का?, असा सवाल वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी केला आहे.
नियत हमेशा सच्ची हैं
2019 लोकसभा निवडणुकीत विजय वडेट्टीवार यांनी किती कष्ट घेतले ते बाळूभाऊ स्वतः सांगताना दिसत आहेत. नियत हमेशा सच्ची हैं, इसलिये काँग्रेस में हमारी बात पक्की हैं!, अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत. चंद्रपूरच्या जागेवरून वाद समोर असताना या पोस्ट चर्चेत आहे. वडेट्टीवार हे कुणबी विरोधक असल्याच्या अपप्रचाराला उत्तर देणाऱ्या या पोस्ट आहेत.
