AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! चालू वर्षात आतापर्यंत देशात 102 वाघांचा मृत्यू, मध्य प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

2021 चालू वर्ष संपायला अजून दोन महिने शिल्लक आहेत. मात्र सरत्या 10 महिन्यात देशात 102 वाघांच्या मृत्यूची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशात नोंदविले गेले आहेत तर महाराष्ट्र 20 आकड्यासह द्वितीय स्थानी आहे.

धक्कादायक ! चालू वर्षात आतापर्यंत देशात 102 वाघांचा मृत्यू, मध्य प्रदेश पहिल्या तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
चालू वर्षात आतापर्यंत देशात 102 वाघांचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 9:35 PM
Share

चंद्रपूर : चालू वर्ष 2021 मध्ये आतापर्यंत देशात 102 वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आली आहे. शिकार- आपसातील झुंज आणि वीज प्रवाहाचा धक्का अशी मृत्यूची प्रमुख कारणे आहेत. वाघांच्या मृत्यू संख्येत मध्यप्रदेश पहिल्या क्रमांकावर तर महाराष्ट्राचे स्थान दुसरे आहे. वाघांचे भ्रमण मार्ग भक्कम करूनच हा प्रश्‍न सोडविता येणार असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे. मागील वर्षी देशात 106 वाघांचा मृत्यू झाला होता. (102 tigers have died in the country in this year, Madhya Pradesh came first and Maharashtra came second)

देशभरातील 22 राज्यांच्या जंगलांमध्ये पुढील वर्षी व्याघ्रगणना होणार

2021 चालू वर्ष संपायला अजून दोन महिने शिल्लक आहेत. मात्र सरत्या 10 महिन्यात देशात 102 वाघांच्या मृत्यूची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशात नोंदविले गेले आहेत तर महाराष्ट्र 20 आकड्यासह द्वितीय स्थानी आहे. देशभरातील 22 राज्यांच्या जंगलांमध्ये पुढील वर्षी व्याघ्रगणना होणार आहे. त्याची तयारी-प्रशिक्षण वेगाने सुरू आहे. बिबट, हत्तींसह व्याघ्रप्रगणनेचा प्रयोग तंत्र शुद्धतेसह पहिल्यांदाच होत आहे. ही तयारी सुरू असताना चालू वर्षातील व्याघ्रमृत्यू हा चिंतेचा विषय ठरला आहे.

व्याघ्रप्रकल्पात सुरक्षा व्यवस्थेची नियोजनबद्ध उतरंड असल्याने शिकारी त्यात अभावाने घुसखोरी करतात. मात्र त्यांचा प्रयत्न व्याघ्रप्रकल्पाबाहेरील वाघांवर असतो. तब्बल 39 टक्के वाघ प्रकल्पाबाहेर असल्याने त्यांची सुरक्षा करण्याची गरज व्यक्त होत आहे. पण, यंदा 52 टक्के व्याघ्रमृत्यू व्याघ्रप्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाले आहेत. 102 पैकी 53 मृत्यू हे व्याघ्रप्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाल्याचे समोर आले आहे. यात शिकारीच्या घटनांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता प्रकल्प व अतिसंरक्षित भागावर कठोर नजर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

या तीन प्रमुख कारणांमुळे वाघांचा मृत्यू

वाघांच्या मृत्यू संदर्भात ठळकपणे तीन महत्वाची कारणे सांगितली जातात. यात, अधिवासासाठी झालेला संघर्ष, शिकार आणि विद्युतप्रवाहाचा धक्का लागणे या 3 मुद्द्यांचा समावेश आहे. यंदा प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार वाघांचे सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशत 32 झाले आहेत. तर महाराष्ट्र 20 संख्येसह दुसऱ्या स्थानावर आहे. कर्नाटक : 15, उत्तर प्रदेश : 9 , केरळ : 6 अशी अन्य राज्यातील संख्या आहे. देश व राज्यात व्याघ्र संवर्धन मोहीम वेगवान झाली असली तरी आता वाघांचे शत्रू ओळखून त्यावर अंकुश घालणे गरजेचे बनले आहे. व्याघ्र संख्या वृद्धिंगत होत असताना शिकारी व वीज प्रवाहाच्या धक्क्याने होत असलेले मृत्यू नियोजनातल्या उणीवा दर्शवत आहेत.

पाच वर्षांतील देशातील व्याघ्रमृत्यू संख्या पुढीलप्रमाणे

वर्ष 2017 – 116 वाघांचा मृत्यू वर्ष 2018 – 102 वाघांचा मृत्यू वर्ष 2019 – 95 वाघांचा मृत्यू वर्ष 2020 – 106 वाघांचा मृत्यू वर्ष 2021 (आतापर्यंत) – 102 वाघांचा मृत्यू (102 tigers have died in the country in this year, Madhya Pradesh came first and Maharashtra came second)

इतर बातम्या

4 साथीदार, 4 महिने प्लॅनिंग, विम्याच्या 37 कोटींसाठी मनोरुग्णाचा खून, नगर हादरलं

नागपुरातील प्रसिद्ध नगरसेवकाच्या घरी धाडसी चोरी, घरातील नोकर झोपले असताना चोरट्यांनी 32 लाखांचे दागिने लांबवले

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.