6 फूट उंच, 10 फूट लांब, 1 टन वजन, महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या बैलाचं निधन

मालकाला कर्ज मुक्त करणारा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल म्हणून गिनीज बुकात नावलौकिक मिळवलेला गज्या बैलाने आज अखेरचा श्वास घेतला आहे. (6 feet tall 10 feet long weight 1 ton, the biggest bull in Maharashtra died)

6 फूट उंच, 10 फूट लांब, 1 टन वजन, महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या बैलाचं निधन
महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या बैलाचं निधन
Follow us
| Updated on: Jul 01, 2021 | 9:41 AM

सांगली : मालकाला कर्ज मुक्त करणारा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल म्हणून गिनीज बुकात नावलौकिक मिळवलेला तथा जन्म बैलाचा पण देह हत्तीचा असणाऱ्या सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथील गज्या बैलाने अखेरचा श्वास घेतला आहे. (6 feet tall, 10 feet long, weight 1 ton, the biggest bull in Maharashtra died)

जन्म बैलाचा पण देह हत्तीचा

कृष्णा सायमोते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहा फूट उंच आणि दहा फूट लांब तसेच जवळपास एक टन वजन असलेल्या गज्याला आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे वाढवले होते. गजाच्या मृत्यूनंतर परिवाराला दु:ख अनावर झाले. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील कृषी प्रदर्शनात विशेष आकर्षण राहिलेल्या गज्याने आजवर अनेक पुरस्कार मिळवलेले आहेत. त्याच्या अवाढव्य शरीरयष्टी, देखणेपणा आणि वजनामुळे जन्म बैलाचा पण देह मात्र हत्तीचा असलेल्या गज्याला कृषी प्रदर्शनात मोठी मागणी असायची.

मालकाला कर्जमुक्त करणारा बैल गेला

तसेच गजा बैलाने या माध्यमातून मालक सायमोते यांना कर्जमुक्त केले होते. त्यांच्या कुटुंबियांनी त्याला न विकता त्याचा शेवटपर्यत सांभाळ केला. काल बुधवारी दुपारी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला.

गजाच्या हाडांचा सापळा संग्राहलयात ठेवण्यासाठी प्रयत्न करणार

कृष्णा सायमोते यांनी त्यांच्या घरच्या शेतात गज्यावर अंत्यसंस्कार केले. गज्याच्या अकाली जाण्याने कसबे डिग्रजसह तमाम बैलप्रेमींनी हळहळ व्यक्त केली. प्रचंड देह आसलेल्या गजाच्या हाडांचा सापळा संग्राहलयात ठेवण्यासाठी शास्त्रीयदृष्ट्या प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

(6 feet tall 10 feet long weight 1 ton, the biggest bull in Maharashtra died)

हे ही वाचा :

अस्थी विसर्जनाच्या पारंपरिक प्रथेला फाटा, आईची रक्षा शेतजमिनीत पसरवली, समाजापुढे नवा आदर्श

नवी मुंबईतील नगरसेविकेचे पती संदीप म्हात्रेंवर गुन्हा, हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना मारहाणीचा आरोप

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.