AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अस्थी विसर्जनाच्या पारंपरिक प्रथेला फाटा, आईची रक्षा शेतजमिनीत पसरवली, समाजापुढे नवा आदर्श

व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याच्या अस्थी किंवा रक्षा पाण्यामध्ये सोडायच्या, अशी पारंपारिक प्रथा आहे. पण याच प्रथेला फाटा देऊन आपल्या आईची रक्षा आपल्याच शेतात पसरवून वाशिममधल्या डोंगरे बंधूंनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे.

अस्थी विसर्जनाच्या पारंपरिक प्रथेला फाटा, आईची रक्षा शेतजमिनीत पसरवली, समाजापुढे नवा आदर्श
अस्थी विसर्जनाच्या पारंपरिक प्रथेला फाटा देत वाशिमच्या डोंगरे कुटुंबीयांनी आईची रक्षा शेतजमिनीत पसरवली.
| Edited By: | Updated on: Jul 01, 2021 | 9:12 AM
Share

वाशिम : व्यक्तीचं निधन झाल्यानंतर त्याच्या अस्थी किंवा रक्षा पाण्यामध्ये सोडायच्या, अशी पारंपारिक प्रथा आहे. पण याच प्रथेला फाटा देऊन आपल्या आईची रक्षा आपल्याच शेतात पसरवून वाशिममधल्या डोंगरे बंधूंनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे. (Washim Dongare Brothers Mother Dead And Ashes bones Are Scattered Fields)

पारंपारिक प्रथेला फाटा, नवा पायंडा घालत समाजापुढे आदर्श

अस्थी विसर्जनाच्या पारंपरिक प्रथेला फाटा देत आईची रक्षा शेतजमिनीत पसरवून मंगरूळपीर तालुक्यातील झोलेबाबा येथील ज्ञानेश्वर डोंगरे, योगेश डोंगरे, हरेश्वर डोंगरे या शेतकरी पुत्रांनी नवा पायंडा घालत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

माणसाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार पार पाडून अस्थी नदीपात्रात विसर्जित करण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. यामुळे मृतात्म्यास मोक्ष मिळतो, असा समज आहे. परंतु अलीकडच्या काळात नदीपात्रातील पाणी दूषित होऊ नये, या उदात्त हेतूने आईच्या अस्थी व रक्षा नदीपात्रात विसर्जित न करता शेतात विसर्जित करीत आहेत.

डोंगरे भावंडांनी उचलेल्या स्तुत्य पावलाचं पंचक्रोशीत कौतुक

याकामी चिखली झोलेबाबा येथील ज्ञानेश्वर डोंगरे, योगेश डोंगरे, हरेश्वर डोंगरे या तिघा भावंडांनी पुढाकार घेतला. डोंगरे भावंडांनी उचलेल्या स्तुत्य पावलाचं पंचक्रोशीत कौतुक होत आहे. डोंगरे भावंडांनी घालून दिलेल्या आदर्शावर इतरांनीही चाललं पाहिजे, किंबहुना ती काळाजी गरज असल्याची भावना गावकऱ्यांनी बोलून दाखवली.

(Washim Dongare Brothers Mother Dead And Ashes bones Are Scattered Fields)

हे ही वाचा :

नागपुरातल्या अनाथालयातील लहानग्यांसाठी नवी मुंबईतील तरुण सरसावले, समाज माध्यमाचा वापर करत निधी उभारणार

कृषी संजीवनी मोहिमेत 40 हजार गावांमध्ये 6 लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन : कृषीमंत्री

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.