AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्रातील नामांकीत बँकेची मान्यता रद्द

रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्रातील एका नामांकीत बँकेची मान्यता रद्द करण्यात आलीय. संबंधित वृत्त समोर आल्यानंतर अहमदनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या बँकेला याआधी आरबीआयकडून अनेकदा संधी देण्यात आली होती. अखेर आरबीआयने बँकेवर कारवाई केली आहे.

मोठी बातमी! रिझर्व्ह बँकेकडून महाराष्ट्रातील नामांकीत बँकेची मान्यता रद्द
| Updated on: Oct 04, 2023 | 8:14 PM
Share

कुणाल जायकर, Tv9 मराठी, अहमदनगर | 4 ऑक्टोबर 2023 : अहमदनगर जिल्ह्यासह 116 वर्षांचा इतिहास असलेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची मान्यता रद्द करण्यात आलीय. बँकेची मान्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने सायंकाळी पाच वाजता बँकेला मेल करून माहिती देण्यात आली. बँकेवर प्रशासक नेमून पुढील कारवाई होणार आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या शक्यता नाही त्यामुळे बँकेची मान्यता रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

रिझर्व्ह बँकेने नगर बँकेला महाराष्ट्रात बँकिंगचा व्यवसाय करण्यास मनाई केली आहे ज्यामध्ये कलम 5 (ब) मध्ये परिभाषित केल्यानुसार ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे समाविष्ट आहे. लिक्विडेशन केल्यावर, प्रत्येक ठेवीदाराला त्याच्या ठेवींची 5,00,000/- (रुपये फक्त पाच लाख) च्या आर्थिक मर्यादेपर्यंत ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल.

बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 95.15% ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम डीआयसीजीसीकडून मिळण्याचा अधिकार आहे. 31 मार्च 2023 पर्यंत, DICGC ने बँकेच्या संबंधित ठेवीदारांकडून प्राप्त झालेल्या इच्छेनुसार DICGC कायदा, 1961 च्या कलम 18A च्या तरतुदींनुसार एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 294.85 कोटी आधीच भरले आहेत.

बँकेला याआधी आल्या होत्या नोटीस

रिझर्व्ह बँकेकडून अर्बन बँकेला गेल्या वर्षभरापासून निर्बंध लादण्यात येत होते. बँकेला या दरम्यानच्या काळात काही महिन्यांसाठी मुदतवाढही देण्यात आली होती. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी रिझर्व्ह बँकेने नगर बँकेला नोटीस पाठवली होती. यामध्ये थकीत कर्ज वसुली, वाढलेला एनपीए, रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं उल्लंघन तसेच अनियमितता याबाबत खुलासा देण्याचे आदेश नोटीसमध्ये होते. तसेच आरबीआयने या बँकेची मान्यता का रद्द करु नये? असाही सवाल या नोटीसमध्ये करण्यात आला होता.

सभागृहातही धुरंधरचा फिव्हर... एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
सभागृहातही धुरंधरचा फिव्हर... एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा.
१९ डिसेंबरनंतर मराठी माणूस PM होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा
१९ डिसेंबरनंतर मराठी माणूस PM होणार? पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.