अकोल्यात टाळेबंदीमध्ये शिथिलता, पाहा काय सुरु, काय बंद?

कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख घसरत असल्यामुळे टाळेबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Akola new guidlines What will be Closed what will be reopen)

अकोल्यात टाळेबंदीमध्ये शिथिलता, पाहा काय सुरु, काय बंद?
अकोल्यात काय सुरु, काय बंद

अकोला : अकोला जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने टाळेबंदी घोषित केली होती. कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख घसरत असल्यामुळे टाळेबंदीमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Akola new guidlines What will be Closed what will be reopen)

नव्या आदेशानुसार काय सुरु राहणार?

टाळेबंदीच्या नवीन नियमानुसार सोमवार पासून सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. हॉटेल रेस्टॉरंट आणि भोजनालय सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाने, खुली मैदाने, जॉगिंग पार्क,सायकलिंग करण्यासाठी नियमित मुभा देण्यात आली आहे. सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या पूर्ण क्षमतेने काम करता येणार आहे. लग्न समारंभ करिता मंगल कार्यालयामध्ये वधू-वरास सह 50 % किंवा 100 पेक्षा कमी लोकांची उपस्थिती असणार आहे.

प्रवासासाठी E Pass कुणाला लागणार?

याचबरोबर अंतिम संस्कार याकरिता 50 लोकांना परवानगी देण्यात आली आहे . टॉकीज मल्टिप्लेक्स नाट्यगृह अशा सर्व क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती सकाळी सात ते रात्री 10 वाजेपर्यंत ठेवता येणार आहे. असून आंतरजिल्हा प्रवासासाठी पूर्णता सूट देण्यात आली आहे तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये लेवल 5 मधून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशनकडे E पास असणे अनिवार्य राहील.

नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये कोरोणाला पूर्णपणे हरवण्यासाठी शासनाने दिलेल्या पंचसूत्रीचा वापर करावा असे आवाहन टाळेबंदी शिथिल करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे .

नियम मोडला तर कारवाई फिक्स!

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेले आदेश सोमवारी सकाळी 7 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागाकरिता लागू राहणार असून आदेशात तसं स्पष्ट करण्यात आलं आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

(Akola new guidlines What will be Closed what will be reopen)

हे ही वाचा :

पुण्यात शनिवार, रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद, वाढत्या गर्दीमुळे महापालिकेचा निर्णय

Maharashtra Rain: पुढच्या 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणाला दोन दिवसांचा रेड ॲलर्ट

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI