“बाबांनो” आता तरी झाडे लावा, बीडच्या डॉक्टरकडून अनोखी जनजागृती मोहीम

भविष्यकाळात ऑक्सिजन मुबलक हवा असेल तर बाबांनो आता तरी एक झाड लावा, अशी आर्त साद बीडचे खासगी डॉ. प्रदीप कुमार उजेगर हे घालत आहेत. Pradeepkumar Ujegar appeal for Tree Plantation

बाबांनो आता तरी झाडे लावा, बीडच्या डॉक्टरकडून अनोखी जनजागृती मोहीम
डॉ.प्रदीपकुमार उजेगर यांचं वृक्षलागवडीचं आव्हान
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 5:03 PM

बीड: जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच ऑक्सिजनचा देखील मोठा तुटवडा भासत असल्यामुळे मृत्यूच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. ऑक्सिजन अभावी रुग्ण तडफडून मरत आहेत. तरीदेखील ऑक्सिजन कुठेही उपलब्ध होत नाही. भविष्यकाळात ऑक्सिजन मुबलक हवा असेल तर बाबांनो आता तरी एक झाड लावा, अशी आर्त साद बीडचे खासगी डॉ. प्रदीपकुमार उजेगर हे घालत आहेत. रुग्णालयात आलेल्या रुग्णांसाठी लिहिण्यात येणाऱ्या मेडीकल चिठ्ठी यावरच डॉक्टर उजेगर यांनी एक झाड लावा अशी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. सध्या त्यांच्या जनजागृतीची मोठी चर्चा बीड जिल्ह्यात सुरू झाली आहे. ( Beed Dr. Pradeepkumar Ujegar appeal to patient for plant one tree for availability of oxygen in future time)

एक झाड लावण्याचे धडे

डॉ. प्रदीप कुमार उजेगर यांचं बीडच्या शाहूनगर मध्ये मातोश्री नावाचे क्लिनिक आहे. ते होमिओपॅथिक पदवीधर आहेत. गेल्या वीस वर्षापासून ते या परिसरातील रुग्णांची सेवा करतात. मात्र, सध्या कोरोनाचा कहर आहे. आणि त्यातच ऑक्सिजन चा मोठा तुटवडा असल्याने डॉक्टर उजगर हे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांनी स्वतःहून एक मोहीम हाती घेतली आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना एक झाड लावण्याचे ते धडे देतायेत.

अनेक महिन्यांपासून मोहीम सुरु

मेडीकल चिठ्ठीवर औषधांच्या बाजूला सूचना म्हणून ऑक्सिजन देणारं एक झाड लावा आणि त्याचं संगोपन करा अशी जनजागृती ते करत आहेत. रुग्णांनी देखील त्यांच्या या मोहिमेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. इथून बरं झाल्यानंतर दुसऱ्यांदा येत असताना हे रुग्ण त्यांनी लावलेले झाड आणि केलेले संगोपन याचा फोटो त्यांच्या व्हाट्सअ‌ॅप वर टाकून झाड लावल्याचा देखील पुरावा देत आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून डॉक्टर उजेगर यांचं जनजागृतीचे कार्य अविरतपणे सुरू आहे. वेळीच गांभीर्यानं वृक्ष लागवड केल्यास येणाऱ्या पिढीला ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही, असं डॉ. प्रदीप कुमार उजेगर यांनी सांगितलं.

अहमदनगरच्या डॉक्टर दाम्पत्याकडून देखील जनजागृती …

नगर येथील डॉ. युवराज आणि कोमल कासार यांनी देखील अशाच पद्धतीची जनजागृती सुरू केली आहे. ते देखील रुग्णांना चिठ्ठीवर एक झाड लावण्याची विनंती करताना दिसत आहेत. नगर आणि बीडच्या खासगी डॉक्टरांची ही अनोखी जनजागृती सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चेत आहे.

संबंधित बातम्या:

गाव कारभाऱ्यांनो, जय-परायज विसरुन संधीचं सोनं करा; अजितदादांचं आवाहन

…आणि पवारांनी फेसबूकचा डीपी बदलला !

( Beed Dr. Pradeepkumar Ujegar appeal to patient for plant one tree for availability of oxygen in future time)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.