पीएम केअर फंडातील 80 टक्के व्हेंटिलेटर जळगावात धूळखात, खासदार उन्मेश पाटील यांचा गंभीर आरोप

"जळगाव जिल्ह्यात रुग्णांना ऑक्सिजनसाठी फिरावे लागत आहे. तर दुसरीकडे केंद्राकडून आलेले 80 टक्के व्हेंटिलेटर धूळखात पडले आहेत", असा आरोप भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी केला (BJP MP Unmesh Patil allegations on Maharashtra Government over ventilator).

पीएम केअर फंडातील 80 टक्के व्हेंटिलेटर जळगावात धूळखात, खासदार उन्मेश पाटील यांचा गंभीर आरोप
खासदार उन्मेश पाटील

जळगाव : “जळगाव जिल्ह्यात रुग्णांना ऑक्सिजनसाठी फिरावे लागत आहे. तर दुसरीकडे केंद्राकडून आलेले 80 टक्के व्हेंटिलेटर धूळखात पडले आहेत”, असा गंभीर आरोप भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी केला आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीबाबत भाजपतर्फे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार रक्षा खडसे तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार उन्मेश पाटील बोलत होते (BJP MP Unmesh Patil allegations on Maharashtra Government over ventilator).

‘पीएम केअर फंडातील 88 व्हेंटिलेर जिल्ह्यात उपलब्ध’

“जळगाव जिल्ह्यात कोरोनाची गंभीर परिस्थिती आहे. पण सरकार उपाययोजना करण्यात असमर्थ ठरले आहे. केंद्राकडून पीएम केअर फंडातील 88 व्हेंटिलेर जिल्ह्यात उपलब्ध झाले. मात्र, त्यातील 80 टक्के आजही धूळखात पडून आहेत”, असा दावा उन्मेश पाटील यांनी केला.

‘शासनाचा भोंगळ कारभार सुरू’

“आम्ही मागणी केली की काम होत नसेल तर सिव्हील हॉस्पिटलमध्ये सर्जन यांची बदली करावी, तसेच रेमेडेसिवीर इंजेक्शनसाठी एका कंपनीने अॅडवान्स रक्कम मागितली तरी त्याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. आता जिल्हाधिकारी यांनी तयारी दर्शविली आहे. अशाप्रकारे शासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे”, अशी टीका त्यांनी केली.

‘पालकमंत्र्यांनी नावाप्रमाणे गुलाबाचा सुंगध दिला पाहिजे’

“पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मिशन मोडवर काम करण्याची गरज आहे. त्यांनी रात्र-दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात बसून नियोजन करून रुग्णांना आपल्या नावाप्रमाणे गुलाबाचा सुंगध दिला पाहिजे. शासन म्हणून त्यांनी कर्तव्य केले पाहिजे”, असा टोला त्यांनी लगावला (BJP MP Unmesh Patil allegations on Maharashtra Government over ventilator).

हेही वाचा : नागरिकांनी फेकून दिलेल्या मास्कचा चक्क गादी बनवण्यासाठी वापर, जळगावात धक्कादायक प्रकार उघड

Published On - 12:09 am, Wed, 21 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI