ST Bus Strike in Maharashtra : एसटीच्या संपाला ठाकरे सरकार कारणीभूत, मंत्री तुपाशी अन् कर्मचारी उपाशी अशी सध्याची अवस्था : विखे पाटील

ST Bus Strike in Maharashtra : एसटीच्या संपाला ठाकरे सरकार कारणीभूत, मंत्री तुपाशी अन् कर्मचारी उपाशी अशी सध्याची अवस्था : विखे पाटील
radhakrishna vikhe patil

राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न जटील बनत चाललाय. मात्र शासनाकडून अजूनही कुठलंही ठोस आश्वासन मिळत नाहीय.

मनोज गाडेकर

| Edited By: Akshay Adhav

Nov 08, 2021 | 1:12 PM

अहमदनगर : राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी राज्यभर एसटी कामगार आणि कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. दिवसेंदिवस एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न जटील बनत चाललाय. मात्र शासनाकडून अजूनही कुठलंही ठोस आश्वासन मिळत नाहीय. या सगळ्या प्रकारावर भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्य सरकारवरर सडकून टीका केली आहे. एसटी महामंडळाचा प्रश्न चिघळण्याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे, सरकारकडे संवेदनशीलता असेल तर त्यांनी किमान कर्मचाऱ्यांशी किमान संवाद साधणं गरजेचं आहे, असं विखे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात एसटी कर्मचारी संपावर

राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्यासह विविध मागण्यांसाठी जवळपास ७० एसटी आगारांमधील कर्मचारी-कामगारांकडून सुरू असलेल्या संपाचा तिढा अजूनही कायम राहिला. राज्यभरातील हजारो कर्मचारी संपावर गेले असून त्यांनी आता बेमुदत आंदोलन पुकारलं आहे.

मंत्री तुपाशी, कर्मचारी उपाशी अशी सध्याची अवस्था

आज परिवहन महामंडळ आणि कर्मचारी वाऱ्यावर आहेत. कर्मचाऱ्यांची मागण्या काय आजच्या नाहीयत. सध्या मंत्री तुपाशी आणि कर्मचारी उपाशी अशी अवस्था असल्याची टीका विखे पाटलांनी केली. कर्मचाऱ्यांशी तात्काळ संवाद साधणं सुरु करा, असा सल्ला विखेंनी राज्य सरकारला दिला. मुलभुत मागण्या मान्य करून राज्यातील जनतेचे हाल थांबवा, अशी मागणीही त्यांनी केली.

राज्य सरकार जबाबदारी झटकण्याच्या कामाचं

हे सरकार जबाबदारी झटकण्याच्या कामाचं आहे. काहीही घडलं की केंद्राकडे बोट दाखवलं जातं, असा पटलवार विखेंनी केला. जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी नवाब मलिक दररोज पत्रकार परिषदा घेतात, असा टोला त्यांनी मलिकांना लगावला.

एसटीचा संप, रेल्वेचं आरक्षण फुल्ल, खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी, प्रवाशांचे हाल

दिवाळीच्या दिवसांत एसटी, रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीण झाल्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी सुरू होते आणि विशेषत: पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या- येणाऱ्या प्रवाशांची सर्रास लूट चालते. सध्या या दोन्ही ठिकाणांसाठीचे खासगी ट्रॅव्हल्सचे दर दोन हजारांवर पोचले असून त्यावर परिवहन विभागाचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे.

दिवाळीसह अन्य सणासुदीच्या दिवसांत रेल्वेचे आरक्षण फुल असते. त्यामुळे दर वर्षीच या दिवसांत खासगी ट्रॅव्हल्स चालक अवाजवी दर आकारून प्रवाशांची लूट करतात. दीड वर्षापासून कोरोनामुळे आधीच रेल्वेगाड्यांची संख्या मर्यादित आहे, त्यात पॅसेंजर गाड्या अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्यांमध्ये प्रवाशांना सामावून घेणे केवळ अशक्य आहे. मात्र, दिवाळीसारख्या सणाला घरी प्रवास करणे आवश्‍यक असल्याने हीच गरज लक्षात घेऊन खासगी ट्रॅव्हल्स चालकांची मनमानी सुरू आहे.

हे ही वाचा :

ST Bus Strike in Maharashtra : सणासुदीचे दिवस, एसटीचा संप, रेल्वेचं आरक्षण फुल्ल, खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी, प्रवाशांचे हाल आणि लूट एकाचवेळी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें