कयादू नदीला पूर, पात्रात तरुण वाहून जाताना आढळला, बाहेर काढण्याचे हिंगोली पोलिसांकडून प्रयत्न

ळमनुरी तालुक्यातील पूर गावाजवळ एक धक्कादायक घटान घडली आहे. या गावाच्या परिसरात कयादू नदीच्या पात्रात एक तरुण वाहून जाताना आढळलाय.

कयादू नदीला पूर, पात्रात तरुण वाहून जाताना आढळला, बाहेर काढण्याचे हिंगोली पोलिसांकडून प्रयत्न
तरुण अशाप्रकारे पाण्यात वाहून जाताना आढळला.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Oct 02, 2021 | 4:35 PM

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील पूर गावाजवळ एक धक्कादायक घटान घडली आहे. या गावाच्या परिसरात कयादू नदीच्या पात्रात एक तरुण वाहून जाताना आढळलाय. सध्या मराठवाड्यात मुसळधार पावसासह अनेक नद्यांना पूर आला आहे. कयाधु नदीसुद्धा दुथडी भरून वाहत आहे. याच नदीच्या पात्रातून एक तरुण वाहून जातना ग्रामस्थांना दिसलाय. या तरुणाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी सध्या प्रयत्न करण्यात येत आहे.

तरुण नदीपात्रात वाहून जाताना आढळला

कयादू नदी सध्या दुथडी भरुन वाहत आहे. या नदीचे पाणी आजूबाजूच्या गावातदेखील गेले आहे. याच नदीच्या पात्रात एक तरुण वाहत येताना नागरिकांना दिसलाय. पाण्यात तो पूर्णपणे उलटा पडल्याचे दिसतेय. नाक आणि तोंडामध्ये पाणी गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. हा तरुण पाण्यातून वाहून जात असल्याचे समजताच नागरिकांना पोलिसांना ही माहिती दिली आहे.

तरुणाला बाहेर काढण्याचे पोलीस, नागरिकांचे प्रयत्न

सध्या पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्या तरुणाला गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. हा तरुण नेमका कुठला आहे, याची माहिती मिळू शकलेली नाही.

इतर बातम्या :

VIDEO: साखर कारखाना काढण्यावर बंदी आणली पाहिजे, गडकरींचे साखरसम्राटांना धक्क्यावर धक्के

VIDEO: मी मागच्या जन्मी पाप केलं, पण आता बाहेर पडलोय, साखरसम्राटांच्या भरसभेत गडकरींचं वक्तव्य, काय घडलं?

ओ शेट, नाद कराच; स्वस्तातलं सोनं घ्यायची संधी हुकवू नका!

(you drowned in river police trying to take him put in hingoli)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें