मेळघाटात एकाच कुटूंबातील 10 जणांना विषबाधा, 7 वर्षीय मुलासह वडिलांचा मृत्यू

अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथे एकाच कुटुंबातील 10 जणांना विषबाधा झाली. यात मुलगा व वडिलांचा मृत्यू झाला आहे.

मेळघाटात एकाच कुटूंबातील 10 जणांना विषबाधा, 7 वर्षीय मुलासह वडिलांचा मृत्यू


अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील डोमा येथे एकाच कुटुंबातील 10 जणांना विषबाधा झाली. यात मुलगा व वडिलांचा मृत्यू झाला आहे. आई लक्ष्मी बछले गंभीर अवस्थेत आहेत. त्यांना जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केलंय. 7 बालकांना चंद्रज्योतीच्या विषारी बिया खाल्ल्यानं विषबाधा झाली.

मुलगा आयुष बछले (वय 7 वर्ष) याचा शुक्रवारी मृत्यू झाला, तर वडील बुधराज बछले यांचा शनिवारी (28 ऑगस्ट) सायंकाळी जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याशिवाय विषारी बिया खाणाऱ्या 7 मुलांवर काटकुंभ आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती सध्या तरी स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

मेळघाटात 3 महिन्यांत 49 बालकांचे मृत्यू, उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीची पावलं

मेळघाटमध्ये गेल्या 3 महिन्यात 49 बालकांचा मृत्यू झालाय. यानंतर उच्च न्यायालयाने राज्य सरकरला फटकारत बालमृत्यू झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार राहील अशी तंबी दिलीय. राज्य सरकारने दखल घेत 15 दिवसांकारिता बालरोग, स्त्रीरोग तज्ञांची नियुक्ती केलीय. 15 दिवसात बालमृत्यू, कुपोषण आटोक्यात येईल का?, असा प्रश्न स्थानिकांना भेडसावतो आहे.

मेळघाटमध्ये कुपोषणाची समस्या कायम

गेल्या अनेक दशकांपासून मेळघाटमध्ये कुपोषणाची समस्या कायम आहे. गेल्या 3 महिन्यात 49 बालमृत्यू झालेत. मेळघाट हा घनदाट जंगलाचा परिसरआहे. या ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव आहे.

दोन तालुक्यांत कायम तज्ज्ञ डॉक्टरांची टीम असायला हवी

सद्यातरी मेळघाट परिसरात आदिवासींना उपचार घ्यायचा असेल तर जंगलातून वाट काढत जावं लागतं. मेळघाटात चिखलदरा व धारणी या तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. मात्र सुविधा व डॉक्टरांचा अभाव आहे. या ठिकाणी कुपोषणाच्या समस्यासह लहान मुलांना पोटफुगी सारखे आजार आहेत. त्यामुळे या ठिकाणी कायम स्त्री रोग,व बालरोग तज्ञ असायला हवा, असं स्थानिक आदिवासी लोकांचं म्हणणं आहे.

महिला व बालकल्याण खातं हे अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे आहेत. त्यांनी बालमृत्यूसंदर्भात आढावा घेतला आहे. तर मेळघाट मधील बालमृत्यू प्रमाण थांबव याकरिता अभियान राबविण्यात येतंय. मात्र कुपोषण व मेळघाटातील विविध आजारांवर उपचारासाठी या ठिकाणी कायम डॉक्टर असतील का? हा खरा प्रश्न आहे.

हेही वाचा :

मेळघाटात 3 महिन्यांत 49 बालकांचे मृत्यू, उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्य सरकारकडून तातडीची पावलं

सरकारच्या भरमसाठ योजना पण मेळघाटातील कुपोषण थांबेना, 3 महिन्यातील धक्कादायक आकडेवारी समोर

मोठी बातमी : RFO दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डीला अटक

व्हिडीओ पाहा :

Death of son and father in Melghat due to eating poisonous seeds

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI