आश्चर्यम ! गावात एकाच विहिरीतून यायला लागलं गरम पाणी, अचानकपणे घडलेल्या प्रकारामुळे तर्कवितर्कांना उधाण

अकोली गावातील भानुदास सोळंके यांच्या घराशेजारी ही विहीर आहे. या विहिरीतील पाणी अचानक गरम झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

आश्चर्यम ! गावात एकाच विहिरीतून यायला लागलं गरम पाणी, अचानकपणे घडलेल्या प्रकारामुळे तर्कवितर्कांना उधाण
buldhana well
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 11:48 PM

बुलडाणा : संग्रामपूर तालुक्यातील अकोली येथील एक विहीर सध्या चर्चेचा विषय ठरलीय. अकोली गावातील भानुदास सोळंके यांच्या घराशेजारी ही विहीर आहे. या विहिरीतील पाणी अचानक गरम झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. याच परिसरात असलेल्या दुसऱ्या विहिरीत मात्र साधारण पाणी आहे. सोळंके यांच्या घराजवळ असलेल्या या विहिरीमध्ये गरम पाणी येत असल्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. (hot water coming out from well of Akoli village in Buldhana district)

विहिरीतून मागील आठवड्यापासून येत आहे गरम पाणी 

मिळालेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी संग्रामपूर तालुक्यातील अकोली हे गाव आहे. या गावात भानुदास सोळंके यांच्या घराशेजारी एक विहीर आहे. या विहिरीतून मागील आठवड्यापासून अचानक गरम पाणी येत आहे. विशेष म्हणजे या विहिरीशेजारी 20 ते 25 फुटांवर दुसरी विहीर आहे. मात्र या विहिरीमध्ये सर्वसाधारण पाणी आहे.

विहिरीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

भानुदास सोळंके यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीतून अतिशय गरम पाणी येत असल्याने गावातील तसेच परिसरातील नागरिक या विहिरीला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. या विहिरीतील पाणी अतिशय गरम आहे. हे पाणी अंघोळीसाठी वापरायचे असेल तर त्यामध्ये बाहेरचे थंड पाणी टाकावे लागत आहे, असा दावा गावातील नागरिक करत आहेत.

पाण्याच्या नमुन्यांची चाचणी केल्यानंतरच निष्कर्ष

बुलडाणा जिल्ह्याच्या सर्व्हेक्षण विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित तहसीलदारांनी या विहिरीची पाहणी केल्याचं सांगण्यात आलं. या विहिरीतल्या गरम पाण्यासह बाजूच्या विहिरीतील पाण्याचेही नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. पाणी तपासणीनंतर विहिरीतील पाणी गरम होण्यामागचे नेमके कारण किंवा निष्कर्ष काढण्यात येईल, अशी माहिती भूगर्भ तज्ज्ञ विश्वास वालदे यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर भूगर्गात अनेक हालचाली होत असतात, त्यामुळे अशा घटना घडतात. नागरिकांनी  घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या :

खूप जीव लावला, घरातील सदस्यासारखं वागवलं, पण मोलकरणीकडून तरीही विश्वासघात, दागिन्यांवर डल्ला

Mumbai Rains Live Update | जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Maratha OBC Reservation : मराठा आरक्षणावरुन रावसाहेब दानवेंनी महाविकास आघाडी सरकारला फटकारलं, ओबीसी आरक्षणावरुनही टोला

(hot water coming out from well of Akoli village in Buldhana district)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.