शिराळाकरांची नागपंचमी यंदाही साधीच, उत्सवावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनची नजर, पोलीस बंदोबस्तही तैनात

जगप्रसिद्ध असणारी शिराळ्याची नागपंचमी यंदाही साध्या पद्धतीने साजरी होत आहे. न्यायालयाचे आदेश आणि कोरोनाची सावट या पार्श्वभूमीवर नागपंचमी साजरी होत आहे.

शिराळाकरांची नागपंचमी यंदाही साधीच, उत्सवावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनची नजर, पोलीस बंदोबस्तही तैनात
सांगलीच्या शिराळ्यात साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी

सांगली : जगप्रसिद्ध असणारी शिराळ्याची नागपंचमी (Nag Panchami) यंदाही साध्या पद्धतीने साजरी होत आहे. न्यायालयाचे आदेश आणि कोरोनाची सावट या पार्श्वभूमीवर नागपंचमी साजरी होत आहे. घरोघरी नागांच्या मूर्तीचे पूजन करून शिराळाकरांना यंदाही साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी करत आहेत. तर प्रशासनाकडून नागपंचमी उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर ड्रोन कॅमेरांची नजर आणि कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिराळ्याची नागपंचमी लोकप्रिय का?

सांगली जिल्ह्यातल्या शिराळा इथे जिवंत नागांच्या पूजेची परंपरा होती. या नागपंचमीचं राज्याला मोठं आकर्षण होतंच पण देशाचीही नजर इथल्या नागपंचमीच्या उत्सवावर असायची. मात्र 2002 पासून न्यायालयाच्या आदेशानंतर शिराळा येथे साध्या पद्धतीने नागपूजा करण्यात येत आहे. यंदा न्यायालयाच्या आदेशाबरोबर कोरोनाचंही सावट आहे. त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने या ठिकाणी नागपंचमी उत्सव साजरा होत आहे.

शिराळाकरांची नागपंचमी साध्या पद्धतीने साजरी

घरोघरी महिलांकडून प्रतिकात्मक मातीच्या नागांची पूजा करण्यात येत आहे. तर नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी म्हणून नागपंचमीच्या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पारित केले आहेत.

पोलीस बंदोबस्त आणि ड्रोन कॅमेरांची नजर

त्याचबरोबर 14 ऑगस्टपर्यंत गावात बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींसाठी प्रवेश बंदी आदेश लागू केले आहेत. त्याचबरोबर या नागपंचमी उत्सवावर नजर ठेवण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून ड्रोन कॅमेराबरोबर शिराळा गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.

नाग पंचमीचा शुभ मुहूर्त काय?

🔶 पंचमी तिथी प्रारंभ – 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजून 24 मिनिटांपासून सुरु होईल

🔶 पंचमी तिथी समाप्त – 13 ऑगस्ट रोजी 1 वाजून 42 मिनिटांनी समाप्त होईल

🔶 पण नाग पंचमीचा सण 13 ऑगस्ट रोजी उदय तिथीनुसार साजरा केला जाईल. या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5 वाजून 49 मिनिटांपासून ते रात्री 8 वाजून 28 मिनिटांपर्यंत असेल.

(Maharashtra Sangali Shirala Nagpanchami is still simple this year, drones keep an eye on the festival, police are also deployed)

हे ही वाचा :

Nag Panchami 2021 | आज नाग पंचमी, जाणून घ्या शुभ मुहूर्त

नागपंचमीला नागाला दूध का पाजतात? यामागे हे आहे शास्त्र!

भगवान शिवशंकरांनी आपल्या गळ्यात नाग का धारण केला? जाणून घ्या यामागील कारण

Published On - 8:30 am, Fri, 13 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI