AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gadchiroli Health | गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात मलेरिया; आरोग्य संचालकांनी बिनागुंडा जंगलात केली पायी वारी

गडचिरोली हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग. येथील बिनागुंडा डोंगर भागात मलेरियानं हातपाय पसरविले. मलेरियाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य संचालकांचं पथकं जंगलात गेले. पायी प्रवास केला. आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.

Gadchiroli Health | गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागात मलेरिया; आरोग्य संचालकांनी बिनागुंडा जंगलात केली पायी वारी
आरोग्य पथकाने घेतला आढावाImage Credit source: t v 9
| Edited By: | Updated on: May 12, 2022 | 6:18 PM
Share

गडचिरोली : जिल्ह्यात सध्या मलेरिया वाढत आहे. त्यामुळं मलेरिया रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाचे संचालक कार्यालयाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली (Aheri, Sironcha, Bhamragad, Etapalli) या चार तालुक्यातील पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी यावेळी करण्यात आली. भामरागड तालुक्यातील बिनागुंडा प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथकाने (चंबु) आठ किलोमीटर पायदळ डोंगराळ भागातून प्रवास केला. आरोग्य संचालिका अर्चना पाटील पुणे व आरोग्य संचालक मुंबई सतीश पवार यांच्यासह उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर (Deputy Director, Health Department, Nagpur) व जिल्हा शल्यचिकित्सक (District Surgeon) जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी हा खडतर प्रवास केला.

15 प्राथमिक आरोग्य केंद्रांची तपासणी

यावेळी अनेक प्राथमिक रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाची तपासणी करण्यात आली. यावेळी रुग्णालयात स्वच्छता नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर अधिकारी रागवले. या पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी केलेल्या पथकासोबत व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी संवाद साधला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्या त्यांनी जाणून घेतल्या. योग्य उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. पावसाळ्या आधी जिल्हा प्रशासन व गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुका प्रशासन नगरपंचायत ग्रामपंचायत व गावकर्‍यांच्या माध्यमाने स्वच्छतेवर भर दिला जाईल. मलेरिया नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन अनेक प्रयत्न करीत आहे, अशी महिती जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दिली. आरोग्य विभागाचे मुख्य सचिवांनी दिलेल्या भेटीनंतर ते बोलत होते.

आठ किलोमीटरची पायपीट

गडचिरोली हा नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील भाग. येथील बिनागुंडा डोंगर भागात मलेरियानं हातपाय पसरविले. मलेरियाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य संचालकांचं पथकं जंगलात गेले. पायी प्रवास केला. आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला. यासाठी सुमारे आठ किलीमीटरचा पायी प्रवासही या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना करावा लागला. गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया थांबण्यासाठी उचलले जात आहे. नेमका कसा होता खडतर पायदळी प्रवास व मलेरियाच्या स्वच्छतेबाबत उपाय योजना केली जाईल. आरोग्याच्या मुख्य सचिव यांच्याकडून गडचिरोलीचे प्रतिनिधी मोहम्मद इरफान यांनी आढावा घेतला.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.