AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नांदेडमध्ये आकड्यांचा पाठलाग; चिखलीकरांना मागे टाकत काँग्रेसच्या वसंत चव्हाणांची घौडदौड

Nanded Lok Sabha Election Results 2024 : नांदेडमध्ये वंसत ऋतू बहरणार असा दावा आमदार अमित देशमुख यांनी लोकसभा निकालपूर्वी केला होता. सध्याची आकडेवारी पाहता वसंत चव्हाण यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे. तर चिखलीकर 10 हजार मतांनी पिछाडीवर असल्याचे दिसून येते.

नांदेडमध्ये आकड्यांचा पाठलाग; चिखलीकरांना मागे टाकत काँग्रेसच्या वसंत चव्हाणांची घौडदौड
नांदेडमध्ये वसंत फुलणार?
| Updated on: Jun 04, 2024 | 1:13 PM
Share

नांदेडमध्ये राजकारणातील कट्टर वैरी प्रतापराव पाटील चिखलीकर आणि भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्यात दिलजमाई झाली. चव्हाण भाजपवासी झाल्यानंतर आता चिखलीकरांचा नांदेड लोकसभा मतदारसंघातील विजय अत्यंत सोपा असेल, असा अंदाज सध्या तरी खरा ठरताना दिसत नाही. या चार तासांत महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी चिखलीकरांना प्रत्येक मतांच्या फेरीत झुंजविल्याचे दिसून येते.

अशोक चव्हाण यांची पण कसोटी

आतापर्यंत प्रतापराव पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यात मोठी चुरस असायची. पण लोकसभा निवडणुकीच्या अगोदर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. नांदेडमध्ये काँग्रेसचे अनेक पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्या मागे बळ उभे केले. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक अवघड असेल असे वाटत होते. पण सध्याच्या ज्या फेऱ्यांमधील मतांची आकडेवारी समोर आली आहे. त्यात दोन्ही उमेदवार एकमेकांचा पाठलाग करताना दिसत आहे.

काँग्रेसच्या पाठीमागे जनतेची सहानुभूती

जनतेने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मोठे प्रेम दिले. त्यांनी भाजपच्या गोटात प्रवेश केला. त्यामुळे आता नांदेडमध्ये भाजप मजबूत होईल अशी आशा होती. पण मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशनानंतरही नांदेडकरांची काँग्रेसला सहानुभूती असल्याचे दिसून आले. आठव्या फेरीत काँग्रेसला 14826 मतांची लीड मिळाली आहे. नांदेडमध्ये काँग्रेसची बाजू हळूहळू भक्कम होताना दिसत आहे. आठव्या फेरीत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण आघाडीवर आहेत.  लातूरचे आमदार अमित देशमुख यांच्याकडे प्रचाराची धूरा होती. त्यांनी नांदेडमध्ये कमळ नाही तर वसंत ऋतू बहरणार असा दावा केला होता. सध्याच्या आकडेवारीवरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीचा सामना असल्याचे दिसून येते. पुढील दोन तासात चित्र अजून स्पष्ट होईल.

नांदेडमधील या दोन फेऱ्यातील मतांची आकडेवारी

नांदेड सातवी फेरी

काँग्रेसचे वसंतराव चव्हाण – 146416

भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर -137369

सातव्या फेरीत काँग्रेसला 9047 मताची लीड ————- आठवी फेरी

काँग्रेसचे वसंतराव चव्हाण – 170556

भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर – 155730

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.