AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

३५ वर्षीय महिलेच्या पोटात दुखत होतं; डॉक्टरकडे गेली तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली

ती एका स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेली. तिने सुरवातीला काही औषधोपचार केला. त्यानंतर सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत तिच्या पोटाचा आकार खूप वाढला होता.

३५ वर्षीय महिलेच्या पोटात दुखत होतं; डॉक्टरकडे गेली तेव्हा तिच्या पायाखालची वाळूच सरकली
| Edited By: | Updated on: Mar 21, 2023 | 8:43 AM
Share

नांदेड : एका ३५ वर्षीय महिलेच्या पोटात दुखत होतं. ती डॉक्टरकडे जात होती. पण, आराम नव्हता. त्रास दिवसेंदिवस वाढतच गेला. त्यामुळे ती एका स्पेशालिस्ट डॉक्टरकडे गेली. तिने सुरवातीला काही औषधोपचार केला. त्यानंतर सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत तिच्या पोटाचा आकार खूप वाढला होता. त्रासही सहन होत नव्हता. सोनोग्राफीचा रिपोर्ट आला तेव्हा महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली. कारण तिच्या पोटात खूप मोठा गोळा तयार झाला होता. शस्त्रक्रियेशिवाय तिला पर्याय नव्हता.

दहा किलोंचा गोळा काढला

दोन तासाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर एका 35 वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल दहा किलोंचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील कल्पना दमयावर या महिलेला पोट दुखीचा नेहमी त्रास होत होता. पोट देखील सुटले होते. नातेवाईकांनी त्या महिलेला गोवर्धन घाट रोडवरील तोटावार हॉस्पिटल या खाजगीमध्ये दाखल केले.

दोन तास चालली शस्त्रक्रिया

सोनोग्राफी केल्यानंतर महिलेच्या पोटात गाठ असल्याचे डॉक्टरांना निदर्शनास आले. हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. आशा तोटावार यांनी नातेवाईकांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर महिला डॉक्टरांने रविवारी दोन तास यशस्वी शस्त्रक्रिया करत पोटातील गोळा काढला.

उजव्या अंडाशयावर गाठ

सुरुवातीला महिलेच्या उजव्या अंडाशयावर गाठ तयार झाली होती. त्यानंतर हळूहळू ही गाठ मोठी झाली आणि पोटात गोळा तयार झाला. अंडाशयाचा चक्क दहा किलोचा गोळा काढून डॉक्टरांनी संबंधित महिलेला जीवनदान दिले. सद्या त्या महिलेची प्रकृती स्थिर आहे, असं डॉक्टर आशा तोटावार यांनी सांगितलं.

कल्पना यांना सुरुवातीला फक्त पोटात दुखत होते. हा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे त्या परेशान झाल्या होत्या. पैसेही खर्च होत होते. शेवटी त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी शस्त्रक्रिया केली. तेव्हा त्यांच्या पोटातून दहा किलोचा गोळा बाहेर पडला. तो गोळा काढल्यानंतर कल्पना यांना आता बरं वाटू लागलं आहे. दहा किलोचा गोळा बाहेर पडल्याने त्यांच्या वजनावरही परिणाम झाला आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.