Nanded | धो धो पावसानं शाळेपर्यंत नेणारा पूलही वाहून गेला, विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

अतिवृष्टीमुळे पुल वाहून गेल्याने गावातील लहान्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आपल्या जीव मुठीत धरून ये-जा करावी लागतंय. तसेच मुखेड ते देगलूर या मार्गावरची वाहतूक ठप्प झाल्याने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईचा सामना करावा लागतोय.

Nanded | धो धो पावसानं शाळेपर्यंत नेणारा पूलही वाहून गेला, विद्यार्थ्यांचा जीव मुठीत घेऊन प्रवास
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 11:40 AM

नांदेड : नांदेड (Nanded) जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावलीयं. यामुळे नद्यांना पूर देखील आला. याचदरम्यान मुखेड तालुक्यातील राजुरा इथला पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला. पूल वाहून गेल्याने पाण्यातूनच स्थानिकांना ये-जा करावी लागतेय. थोड्याश्या पावसाने (Rain) देखील या ठिकाणी ओढ्याला पूर येत असल्याने शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून शाळा गाठावी लागतेय. ग्रामस्थांनी याठिकाणी पुन्हा पुल उभा करून देण्याची मागणी केलीयं. मात्र, याकडे प्रशासनाने अजून लक्ष दिले नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना धोकादायक (Dangerous) पध्दतीने प्रवास करावा लागतोयं.

मुखेड ते देगलूर मार्गावरची वाहतूक ठप्प

अतिवृष्टीमुळे पुल वाहून गेल्याने गावातील लहान्यांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच आपल्या जीव मुठीत धरून ये-जा करावी लागतंय. तसेच मुखेड ते देगलूर या मार्गावरची वाहतूक ठप्प झाल्याने पंचक्रोशीतील गावकऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईचा सामना करावा लागतोय. हा पूल तात्काळ दुरुस्त करून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केलीय. कारण पुल नसल्याने नागरिकांना गावाच्या बाहेर पडणे देखील अवघड झाले आहे.

हे सुद्धा वाचा

विद्यार्थी करतायंत धोकादायक प्रवास

नांदेड शहरातही रस्त्यांची पार चाळण झालीयं. रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने अपघाताच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे. रस्तावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहेत. त्यामुळे जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागतोय. त्यातच यंदा पावसाळ्याच्या अगोदर शहरातील खड्डे बुजवण्याचे कष्ट मनपाने घेतलेच नाहीत, त्यामुळे आहेत ते खड्डे अजून मोठे बनत आहेत. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकाला खड्ड्याचा अंदाज देखील येत नाही.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.