सततचं लॉकडाऊन, बिकट आर्थिक परिस्थिती, जळगावात कर्जबाजारी सलून कामगाराची आत्महत्या

सततच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या जळगावातील सलून व्यवसायिकाने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. गजानन कडु वाघ (वय 35, रा. लक्ष्मीनगर) असे मृत सलुन व्यवसायिकाचे नाव आहे. (salon worker commits suicide in Jalgaon)

सततचं लॉकडाऊन, बिकट आर्थिक परिस्थिती, जळगावात कर्जबाजारी सलून कामगाराची आत्महत्या
सततच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या जळगावातील सलून व्यवसायिकाने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली.
अनिल केऱ्हाळे

| Edited By: Akshay Adhav

Jul 05, 2021 | 8:50 AM

जळगाव : सततच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या जळगावातील सलून व्यवसायिकाने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. गजानन कडु वाघ (वय 35, रा. लक्ष्मीनगर) असे मृत सलुन व्यवसायिकाचे नाव आहे. (salon worker commits suicide in Jalgaon)

गजानन वाघ गेल्या वर्षांपासून जळगाव शहरात स्थायिक झाले होते. लक्ष्मीनगरात भाड्याच्या खोलीत ते पत्नी व दोन मुलांसह राहत होते. मात्र कोरोना काळात सलून दुकानांवर आलेले निर्बंध त्यामुळे त्यांच्या हाताला काम मिळत नव्हते. सुरुवातीच्या काळात मालकाकडून काही मदत मिळत होती मात्र नंतर ती बंद झाली.

सततचं लॉकडाऊन, उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर

सलून दुकानावर कारागिर म्हणून ते काम करीत होते. पहिल्या टप्प्यातील लॉकडाऊनमुळे दुकाने बंद पडली. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्या समोर ठाकला होता. सुरूवातीच्या काळात सुलन दुकानादारांकडून काही प्रमाणात मदत मिळाली. लॉकडाऊन वाढतच गेल्यामुळे वाघ यांची आर्थिक परिस्थिती पुर्णपणे ढासाळली.

आर्थिक परिस्थिती ढासळली होती…

त्यामुळे त्यांनी हातउसनवारी करुन घरखर्च भागवण्यास सुरूवात केली. मात्र परिस्थितीत कोणतीही सुधारणा होईना, हाताला काम मिळत नव्हतं आणि उसन्या पैशांची रक्कम वरचेवर वाढत होती. अखेर त्यांनी टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन जीवन संपवलं. मृत वाघ यांच्या पश्चात पत्नी सरला, आई लताबाई,  मुलगा ऋषीकेश (वय 5) व मुलगी वैष्णवी (वय 3) असा परिवार आहे.

(salon worker commits suicide in Jalgaon)

हे ही वाचा :

कुरकुरे देण्याच्या बहाण्याने पुण्यात चिमुरडीवर बलात्कार, 30 वर्षीय बिहारी तरुणाला अटक

राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांना धमकी, आरोपीला अटक

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें