AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule: तुळजापूर ड्रग्स प्रकरण तापले; सुप्रिया सुळेंच्या आरोपांना राणा जगजितसिंह पाटलांचे रोखठोक उत्तर

Rana Jagjitsinh Patil on Supriya Sule : धाराशिवमधील ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश चांगलाच गाजला. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केल्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी त्यांना खुले पत्र लिहिले आहे.

Supriya Sule: तुळजापूर ड्रग्स प्रकरण तापले; सुप्रिया सुळेंच्या आरोपांना राणा जगजितसिंह पाटलांचे रोखठोक उत्तर
राणा जगजितसिंह पाटील, सुप्रिया सुळे
| Updated on: Nov 19, 2025 | 12:46 PM
Share

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर ड्रग्ज प्रकरण आणि माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांचा भाजप प्रवेश सध्या वादाचा विषय ठरले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रकरणात मोठा हल्लाबोल केला होता. त्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना खुले पत्र लिहिले आहे. तुम्ही केलेले आरोप चुकीचे आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा राजकीय अपरिहार्यतेतून केल्याचा आरोप राणांनी केला आहे. दरम्यान, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर भाजपात प्रवेश करण्याच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीमध्येच होता असा देखील दावा त्यांनी केला. आता याप्रकरणात दोन्ही गट आमने-सामने आल्याचे दिसून आले आहे.

ड्रग्ज प्रकरणात उघडकीस आणण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांनाच आरोपी केल्याचा दावा त्यांनी केला. तेरणा ट्रस्ट प्रकरणी देखील आरोप खोडून काढण्याचा राणा पाटील यांनी प्रयत्न केला.काही शंका असल्यास दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा असल्याचे त्यांनी या पत्रातून आवाहन केले आहे. सुप्रिया सुळेंनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी भाजपनं घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना खुले पत्र लिहिले आणि त्यांची बाजू मांडली.

राजकीय अपरिहार्यतेतून आरोप

या पत्रात राणा जगजितसिंह पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर आरोप केले. अजितदादा पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक आहेत, त्याप्रमाणेच आपण सुद्धा माझ्या जवळच्या नातेवाईक आणि माझ्या थोरल्या बहीण आहात आणि त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान आहे. मात्र, काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्यतेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल जाहिरपणे सलग वक्तव्ये करीत आहात, असा दावा केला.

परमेश्वर हे तर अगोदर राष्ट्रवादीतच

तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर यांनी माझ्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे तुळजापूर शहरातील प्रमुख नेते होते, हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. त्यांच्यावर ड्रग्जप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही काढून टाकण्यात आले नव्हते. ते ही योग्यच होते, कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल केलेल्या संविधानातील तरतुदीनुसार, जोवर एखादा दोष सिद्ध होत नाही, तोवर त्या व्यक्तीला निरपराधच मानले जाते. त्यामुळेच तर आपल्या सहकारी असलेल्या राज्यातील मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप असतानादेखील आपण त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले होते, असा टोला जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला लगावला.

हे बदनाम करण्याचे षडयंत्र

आपण स्वतः एवढ्या जबाबदार व्यक्ती असतानाही आपल्याकडून जे काही बोललं गेलं, ते तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजापूरची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या षडयंत्राला नकळत का असेना बळ देणारं आहे. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत आपण सलग दोन वेळा जे वक्तव्य केले आहेत, त्याची वस्तुनिष्ठ माहिती आपण जाणून घ्यायला हवी होती. नाहीतर ही वक्तव्ये राजकारण्याने प्रेरित ‘मीडिया ट्रायल’ करण्यासाठी जाणीवपूर्वक केली जात असल्याचं स्पष्ट होतंय, असा आरोप जगजितसिंह पाटील यांनी केला आहे.

खरा गुन्हेगार कोण हे न्यायपालिका ठरवेल

विधानसभा निवडणुकीच्या काळात तुळजापूर शहरातील स्थानिक माता-भगिनींनी शहरात सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराची माहिती मला दिली. त्याचवेळी हे सगळं उध्वस्त करून टाकण्याचा शब्द मी त्यांना दिला होता. त्यानुसार मी खोलात जाऊन याबाबत माहिती मिळविली. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मी स्वतः मॅसेज करून याबाबतची माहिती पुरवली व पाठपुरावा केला. तसेच, याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देण्यासाठी विनोद गंगने यांना जोडून दिले. या व्यक्तीने हे सगळे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले. दुर्देवाने पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच यात आरोपी बनविले. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करताना या बाबी आवर्जून नमूद केल्या आहेत. कोण खरे गुन्हेगार आहेत? हे अंतिमतः न्यायालय ठरवेलच, असा विश्वास आमदार महोदयांनी व्यक्त केला.

Rana Jagjitsinh Patil on Supriya Sule

सुप्रिया सुळे यांना खुले पत्र

अंजली दमानियांच्या आरोपांना उत्तर

अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेत तेरणा ट्रस्टने केवळ सहभाग घेतला आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र कोणीही सहभागी झाले नाही. तिसऱ्यांदा निविदा निघाल्यानंतर तेरणा ट्रस्टने त्यात सहभाग घेतला. यात नेमकं चुकीचं काय झाले आहे? जरा आपण सांगू शकलात, तर बरं होईल, म्हणजे आपलं नेमकं म्हणणं काय हे कळेल, असे आवाहन राणा जगजितसिंह यांनी केले आहे. आपल्या अजूनही काही शंका असतील, तर त्या दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपल्यासबोत चर्चा करून सगळी वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची माझी तयारी आहे, असे पाटील यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.