क्लास-बिसची भानगड नाय, बसल्या बैठकीला 10 तास अभ्यास, UPSC चं चक्र परळीच्या ‘अभिमन्यू’ने सहज भेदलं!

परळी वैजनाथ येथील यशवंत अभिमन्यू मुंडे यांने नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. संपूर्ण भारतातून 502 वी रँक त्याने मिळवली आहे.

क्लास-बिसची भानगड नाय, बसल्या बैठकीला 10 तास अभ्यास, UPSC चं चक्र परळीच्या 'अभिमन्यू'ने सहज भेदलं!
UPSC यशवंत अभिमन्यू मुंडे
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 2:14 PM

बीड : परळी वैजनाथ येथील यशवंत अभिमन्यू मुंडे यांने नुकत्याच झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. संपूर्ण भारतातून 502 वी रँक त्याने मिळवली आहे. त्याच्या यशाबद्दल परळीकर आनंद व्यक्त करतायत. तर परळीचे आमदार तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अभिमन्यूचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं आहे.

यशाला शॉर्टकट नाही, एकच मार्ग परिश्रम-परिश्रम!

यूपीएससी परीक्षेचा अभ्यास ते निकाल या प्रवासाविषयी अभिमन्यूने आपल्या भावना व्यक्त केल्या. UPSC परीक्षेत मेहनतीला शॉर्टकट आणि पर्याय नाही. एकच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन ठरलेल्या मार्गावर चालत असताना आत्मप्रेरणा घेणे गरजेचे आहे, असं यशाचं गुपित त्याने सांगितलं.

“मीसुद्धा अत्यंत सामान्य कुटुंबातील मुलगा असून माझे वडील निवृत्त क्रीडा शिक्षक आहेत तर आई गृहिणी आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण परळीत झाल्यानंतर लातूरमध्ये मी महाविद्यालयीन शिक्षण घेतले. इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर मी नोकरी न करता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला.”

दररोज 10 तास अभ्यास, कोणताही क्लास नाही

“दररोज 10 तास मी अभ्यास केला, कुठलेही क्लासेस मी लावलेले नाहीत. तरुणांमध्ये जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर कुठलेही उद्दिष्ट अशक्य नाही. इतरांकडून तर प्रेरणा घ्याच पण आत्मप्रेरणा आणि अभ्यासाच्या बाबतची निष्ठा प्रामाणिक असली पाहिजे”, असं अभिमन्यूने सांगितलं.

ग्रामीण भागातील मुलांचे अधिकारी होण्याचे प्रमाण कमी असले तरी अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणावर जागृती होऊ लागली असून, मुले अधिकारी होऊ लागले आहेत. या गोष्टीचे आपल्याला अत्यंत समाधान असल्याची भावना यशवंत मुंडेंनी व्यक्त केली.

4 वर्ष जीवतोड मेहनत, लातूरच्या लेकीसमोर यशाने पिंगा घातला, 21 व्या वर्षी UPSC क्रॅक!

 यूपीएससी नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातून 100 पेक्षा अधिक परीक्षार्थींनी यश संपादन केलं आहे. मुळची लातूरची असलेली नितीशा जगताप हिचं या परीक्षेतलं यश पाहता तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अवघ्या 21 व्या वर्षी तिने देशातली सगळ्यात अवघड समजली जाणारी UPSC परीक्षा तिने क्रॅक केलीय. अनेक जणांना 21 व्या वर्षी आयुष्याची दिशाही कळत नाही. पण लातुरच्या या लेकीने 21 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन तरुणाईसमोर आदर्श निर्माण केलाय.

पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक!

नितीशाच्या घरची परिस्थिती फार काही बरी नाही. वडील एलआयसी एजंट तर आई गृहिणी. पण नितीशाच्या मनात लहानपणापासून शिक्षणाची जिद्द होती. मोठं होऊन अधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न होतं. त्या स्वप्नांना आई वडिलांनी खतपाणी घातलं. केवळ शिक्षणासाठी तिची आई तिच्याबरोबर पुण्यात राहायला आली. लेकीनेही अभ्यासात कोणतीच कसर ठेवली नाही. प्रामाणिक प्रयत्न असेल तर यशदेखील पिंगा घातलं, हे नितीशाने दाखवून दिलं. अवघ्या 21 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली.

(UPSC Result Beed parali Abhimanyu Munde Alear Upsc Exam Got 502 Rank)

हे ही वाचा :

वडील LIC एजंट, आई गृहिणी, 4 वर्ष जीवतोड मेहनत, लातूरच्या लेकीसमोर यशाने पिंगा घातला, 21 व्या वर्षी UPSC क्रॅक!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.