पुराच्या पाण्यातून बैलगाडी हाकणं जीवावर, दोन्ही बैलांपाठोपाठ शेतकऱ्याचाही मृतदेह आढळला

गुरुवारी बैलगाडीसह वर्ध्याचे शेतकरी संतोष शंभरकर पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. शुक्रवारी महसूल विभागाचे तलाठी प्रेम ढवळे यांना शेतकऱ्याचा मृतदेह सापडला.

पुराच्या पाण्यातून बैलगाडी हाकणं जीवावर, दोन्ही बैलांपाठोपाठ शेतकऱ्याचाही मृतदेह आढळला
शेतकरी बैलगाडी हाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ


वर्धा : बैलगाडीसह पुरात वाहून गेलेल्या वर्धा जिल्ह्यातील त्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोन्ही बैलांचा मृत्यू झाला होता. अखेर, महसूल विभागाच्या तलाठ्यांना शेतकऱ्याचाही मृतदेह आढळला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकरी बैलगाडी हाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

नेमकं काय घडलं?

नाल्यातील पुरातून बैलगाडी घेऊन जाण्याचा प्रयत्न शेतकऱ्याच्या जीवावर बेतला. वर्धा जिल्ह्यातील तास येथील शेतकरी संतोष शंभरकर गुरुवारी बैलगाडीसह पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. शुक्रवारी महसूल विभागाचे तलाठी प्रेम ढवळे यांना त्यांचा मृतदेह सापडला. शवविच्छेदन करुन मृतदेह गावकऱ्यांना सोपवण्यात येणार आहे.

वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी, ओढे ओसंडून वाहत आहेत. समुद्रपूर तालुक्यातील तास या गावात शेतकरी संतोष शंभरकर यांनी नाल्याच्या पुरातून बैलगाडी हाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्यासह बैलगाडी वाहून गेली. बैलगाडीला जुंपलेला एक बैल काही अंतरावर मृतावस्थेत आढळला होता.

पाहा व्हिडीओ

खुरपणी करण्यासाठी गेलेली महिला गेली वाहून

नदी, नाल्यांना पूर आलेला असताना त्या पाण्यात उतरणे म्हणजे जीव धोक्यात घालणे. कुठेही जायचं असेल तर पाणी ओसरण्याची वाट पाहणंच हिताचं आहे. अशीच एक घटना याच तालुक्यातील लाहोरी रोडवरील वाघाडी नाल्याच्या पुलावर घडली. या घटनेत शेतात खुरपणी करण्यासाठी गेलेली महिला वाहून गेली. रंभाबाई मेश्राम अस महिलेचं नाव आहे. ही महिला शेतात खुरपणी करून परत येत होती. मात्र ती महिला अद्याप सापडलेली नाही.

संबंधित बातम्या :

VIDEO | ओढ्याच्या पुरातून जाताना बाईक कलंडली, कोल्हापुरात हवाई दलातील जवान वाहून गेला

VIDEO | पुराच्या पाण्यात बाईक घालण्याचं धाडस अंगलट, कृषी केंद्र संचालकाचा वाहून गेल्याने मृत्यू

हृदयद्रावक ! पुराच्या पाण्यातून बैलगाडी नेण्याचा प्रयत्न, बैलाचा मृत्यू, शेतकरी बेपत्ता, पाहा व्हिडीओ

(Wardha farmer flown away with bullock cart in flood due during heavy rain found dead)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI