पालघर हादरले! अज्ञात हल्लेखोरांकडून चिकन सेंटरच्या मालकावर गोळीबार

पालघर शहरातून धक्कादयाक घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी एका चिकन सेंटरच्या मालकावर गोळीबार केला आहे. जावेद लुलानिया असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पालघर हादरले! अज्ञात हल्लेखोरांकडून चिकन सेंटरच्या मालकावर गोळीबार

पालघर – शहरातून धक्कादयाक घटना समोर आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी एका चिकन सेंटरच्या मालकावर गोळीबार केला आहे. जावेद लुलानिया असे हल्ला झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या गोळीबारात लुलानिया हे जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान हा हल्ला का झाला, हल्लेखोर कोण होते? याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

हल्लेखोर फरार 

पालघरमधील नजर अली चाळ परिसरात ही घटना घडली आहे. याच परिसरामध्ये जावेद लुलानिया यांचे दुकान आहे. दुकानासमोरच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. दोन हल्लेखोर बाईकवर आले होते, त्यांनी लुलानिया यांच्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यामध्ये लुलानिया जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात  उपचार सुरू आहेत. हा हल्ला का झाला हे अद्याप समोर आले नाही.

पोलिसांकडून तपासाला सुरुवात

दरम्यान गोळीबाराच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. हा हल्ला का करण्यात आला? हल्लेखोर कोण होते याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संबंधित बातम्या 

धक्कादायक! मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यावर फेरीवाल्यांचा हल्ला; पोलिसांनाही घातला घेराव

प्रोटेक्ट टू Crime आणि प्रोटेक्ट टू Terrorism सरकारची भूमिका; भाजप नेते आशिष शेलारांचा गंभीर आरोप

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI