मी मरेन, तुलाही गुंतवेन… पंकजा मुंडेंच्या पीएने दिली होती पत्नीला मोठी धमकी, थेट हातावर वार करत…
मंत्री पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे सध्या अडचणीत सापडला आहे. अनंत गर्जेचे काही दिवसांपूर्वीच गाैरी हिच्यासोबत लग्न झाले होते. बीडमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. अनंतच्या छळाला कंटाळून गाैरीने आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.

मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. मुंबईतील वरळी भागात असलेल्या राहत्या घरी त्यांनी आत्महत्या केली. गाैरी पालवे गर्जे पेशाने डॉक्टर होत्या. गाैरी आणि अनंत यांचा विवाहसोहळा बीड येथे आलिशान पद्धतीने पार पडला. गाैरीच्या आई वडिलांना या लग्नात 50 ते 60 लाख खर्च केली. लग्नाच्या काही महिन्यानंतरच दोघांमध्ये प्रचंड वाद सुरू झाली. गाैरीला आल्या नवऱ्याचे इतर महिलांसोबत संबंध असल्याची माहिती मिळाली. यादरम्यान दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. शेवटी गाैरीने त्याला माफ केले. मात्र, यानंतरही तो इतर महिलांसोबत चॅटिंग करत असल्याचे गाैरीच्या लक्षात आले आणि ती तणावात होती. काल दोघांमध्ये कडाक्याची भांडणे झाली. अनंतच्या अनैतिक संबंधांना गाैरी पार कंटाळली होती.
हेच नाही तर ज्यावेळी गाैरीला अनंत गर्जेचे अनैतिक संबंध समजली होती, त्यावेळी दोघांमध्ये प्रचंड भांडणे झाली. अनंत गर्जेने स्वत:च्या हातावर चाकूने सपासप वार केले आणि म्हटले की, मी तर मरेल पण तुलाही गुंतवेल… गाैरीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, आमची मुलगी खूप जास्त मेहनती होती. ती एक चांगली डॉक्टर होती आणि स्वत:च्या पायावर उभी होती खूप जास्त मेहनत करून ती इथपर्यंत पोहोचली होती.
गाैरी आत्महत्या करूच शकत नाही. मागील काही महिन्यापासून अनंत गाैरीचा मानसिक छळ करत होता. त्याच्या म्हणण्यानुसार, गाैरीने आत्महत्या केली… मग हा स्वत: कसा तिला घेऊन रूग्णालयात पोहोचला? गाैरीने आत्महत्या केली होती तर याने पोलिसांनी घरी बोलावणे अपेक्षित होते ना.. ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचा नातेवाईक आरोप करत आहेत.
अनंत गर्जे याच्याविरोधात पोलिसांनी अजूनही गुन्हा दाखल केला नसल्याने नातेवाईक संताप व्यक्त करत आहेत. मुंबईच्या नामांकित रूग्णालयात डॉक्टर म्हणून गाैरी कार्यरत होती. गाैरीला काही पुरावे अनंत गर्जेच्या अफेअरबद्दल मिळाल होती. तिने सर्व पुरावे आपल्या वडिलांना दिली होती आणि आपल्यासोबत काय घडतंय हे तिने तिच्या कुटुंबियांना सांगितले होते.
