Ahmednagar : Pankaja Munde यांनी घेतला क्रांती चौकातील हॉटेलमध्ये गुळाच्या चहाचा आस्वाद
अहमदनगरला (Ahmednagar) शेवगाव येथे माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) रात्री उशिरा चहा (Tea) पिण्याचा आनंद घेतलाय. आष्टीहून औरंगाबाद येथे जात असतांना शेवगाव येथे कार्यकर्त्यांसोबत चहा पीत त्यांची विचारपूस केलीये.
अहमदनगरला (Ahmednagar) शेवगाव येथे माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) रात्री उशिरा चहा (Tea) पिण्याचा आनंद घेतलाय. आष्टीहून औरंगाबाद येथे जात असतांना शेवगाव येथे कार्यकर्त्यांसोबत चहा पीत त्यांची विचारपूस केलीये. शहरातील एका दुकानात साधेपणाने चहा घेतल्याचा त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्या साधेपणाची चर्चा सुरू आहेय. औरंगाबाद येथे जात असताना रात्री 11च्या दरम्यान कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव शेवगाव येथे त्या थांबल्या होत्या. यावेळी शहरातील क्रांती चौकातील अमजद पठाण यांच्या हॉटेलमध्ये त्यांनी गुळाचा चहा घेतला. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आपण तुमच्यासाठीच थांबलो असल्याचे दुकानदार अमजद पठाण यांनी पंकजा मुंडे यांना गंमतीत सांगितले. तर गाडीत गरम चहा लागतो, असे पंकजा मुंडे आपल्या कार्यकर्त्यांना म्हणताना व्हिडिओमध्ये दिसते.
Published on: Mar 21, 2022 05:00 PM
