AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पनवेल महापालिकेकडून कोरोना रुग्णांसाठी खास नियंत्रण कक्ष, एका मेसेजवर मिळणार बेडची माहिती

एखाद्या रुग्णालयात बेड उपलब्ध असेल तर रुग्ण आणि रुग्णांचा संपर्क करुन देण्याचे काम नियंत्रण कक्ष करणार आहे. (PMC Special control room for covid 19)

पनवेल महापालिकेकडून कोरोना रुग्णांसाठी खास नियंत्रण कक्ष, एका मेसेजवर मिळणार बेडची माहिती
प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Apr 26, 2021 | 9:48 AM
Share

पनवेल : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पनवेल महानगरपालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयातील बेड उपलब्धतेसाठी महापालिकेने नियंत्रण कक्ष उभारले आहे. या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेटिंलेटर बेड उपलब्धतेविषयी माहिती मिळणार आहे. त्याशिवाय एखाद्या रुग्णालयात बेड उपलब्ध असेल तर रुग्ण आणि रुग्णांचा संपर्क करुन देण्याचे काम नियंत्रण कक्ष करणार आहे. (Panvel Municipal Corporation Special control room for corona patients get bed information through WhatsApp message)

राज्य सरकारने ठरवून दिलेल्या 80:20 धोरणांनुसार सर्व खाजगी कोव्हिड -19 रुग्णालयांना 80 टक्के बेड महापालिकांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य आहे. हे नियंत्रण कक्षातील पथक या रुग्णांलयांवर लक्ष ठेवून असणार आहे. बेड उपलब्धतेसाठी रूग्णालयांनी डॅशबोर्डवर माहिती अद्ययावत करण्यावरही हे पथक लक्ष ठेवणार आहे. बेड उपलब्धतेसाठी 8928931034/ 8928931049 या क्रमांकांवर नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

बेडची माहिती कशी मिळणार? 

  • पनवेल महापालिका हद्दीत बेडसाठी 8928931041/ 8928931052 हे दोन व्हॉटस् अॅप नंबर देण्यात आले आहेत.
  • या नंबरवर केवळ नागरिकांनी रुग्णांची माहिती (कागदपत्रे) नियंत्रण कक्षातील पथकास द्यावी.
  • त्यानंतर बेड उपलब्ध झाल्यानंतर रुग्णांशी संबधित नातेवाईक आणि संबधित रूग्णालय यांच्यामध्ये संपर्क साधेल.

नियंत्रण कक्षाचे काम काय?

  • प्रत्येक दिवशी सर्व कोव्हिड रुग्णालयातील डॉक्टरांना सूचना देऊन सौम्य किंवा मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येईल
  • तो बेड गंभीर रुग्णांसाठी बेड उपलब्ध करुन हे पथक रुग्णांलयाना सूचना देईल
  • रोजच्या रोज कोव्हिड रुग्णालयातील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूबाबत माहिती गोळा करुन ती आरोग्य विभागाकडे दिली जाईल.
  • तसेच महानगरपालिकेव्दारे चालविल्या जात असलेल्या किंवा कराराने उपलब्ध करून घेतलेल्या रुग्णालयात रूग्ण दाखल करण्याच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले जाईल.

पथकाचे काम 24 तास चालणार 

दरम्याने हे पथक 24 तास काम करणार आहे. तीन वेगवेळी पथके सकाळी 8.00 ते सायं. 4.00 , सायं 400 ते रात्री 12.00, रात्री 12.00 ते सकाळी 8.00 अशा तीन पाळ्यांमध्ये काम करणार आहे. या तीन पाळ्यांमध्ये तीन डॉक्टरर्सही या पथकामध्ये असणार आहेत. या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पालिकेव्दारे करण्यात आले आहे. (Panvel Municipal Corporation Special control room for corona patients get bed information through WhatsApp message)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | मोठी बातमी ! राज्यात नव्या कोरोनाग्रस्तांची संख्या घटली, पण मृतांच्या संख्येत मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची काय स्थिती ?

Coronavirus: कोरोना मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी महापालिकेकडून 6000 रुपयांची मदत मिळणार

माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका

Follow Us
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ