AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी माहिती समोर! एकनाथ खडसेंच्या घरी डल्ला मारणारे चोर सापडले, त्या सीडींचं काय झालं?

Eknath Khadse Rubbery: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरी चोरी झाली होती. चोरट्यांनी घरातून अनेक गोष्टी पळवल्या होत्या. आता या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

मोठी माहिती समोर! एकनाथ खडसेंच्या घरी डल्ला मारणारे चोर सापडले, त्या सीडींचं काय झालं?
eknath-khadseImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 03, 2025 | 3:59 PM
Share

काही दिवसांपूर्वी माजी मंत्री तथा विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील घरात चोरी झाली. चोरांनी घरातील मौल्यवान वस्तू, पैसे आणि सीडी चोरल्या होत्या. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच चोरलेले मौल्यवान दागिने देखील पोलिसांना सापडले आहेत.

दोन आरोपींना अटक

एकनाथ खडसे यांच्या घरी झालेल्या चोरीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जळगाव येथे घरफोडी केल्यानंतर आरोपींनी उल्हासनगर येथे चिराग सय्यद या व्यक्तीकडे मुद्देमाल सोपवला होता. तसेच चिराग सय्यद याने हा मुद्देमाल कैलास खंडेलवाल नामक सराफ व्यवसायाकडे दिला होता. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्ष घरफोडी करणारे तीन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. एजाज अहमद, मोहम्मद बिलाल, बाबा अशी या मुख्य आरोपींची नावे आहेत. हे तिघेही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

मुद्देमाल करण्यात आला जप्त

एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी झाल्यानंतर त्यांनी घरातून कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह चोरी झाल असल्याचा दावा केला होता. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह आढळलेला नाही. तसेच एकनाथ खडसे यांनी एफआयआरमध्ये तसेच पुरवणी जबाबात कागदपत्रे, सीडी व पेन ड्राईव्ह चोरी झाल्याचे म्हटले नसल्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

काय काय चोरीला गेले होते?

एकनाथ खडसे यांच्या घरातून सोने, चांदी आणि रोख रक्कम चोरीला गेले होते. त्यामधील सोन्याच्या वस्तूंमध्ये २० ग्रॅमची गहू पोत, ७ ग्रॅमचे कानातले, ४ ग्रॅमचे डायमंडचे कानातले, ७ ग्रॅमच्या अंगठ्या, १० ग्रॅमचे गोल, २० ग्रॅमच्या चार अंगठ्या चोरीला गेल्या होते. एकूण ६८ ग्रॅम सोने चोरीला गेले आहे. तर घरातील चांदीच्या वस्तूंमध्ये १ किलोची गदा, १ किलोचे त्रिशूल, चांदीचे सहा ग्लास, २ किलोची चांदीची तलवार, २ किलो वजनाचे दोन चांदीचे रथ होते. एकूण ७ किलो ७०० ग्रॅम चांदी चोरीला गेली होती. तसेच एकनाथ खडसे यांच्या घरातून ३५ हजार रुपयांची रोकड देखील चोरीला गेली होती. अंदाजे एकूण 10 ते 12 लाख रूपयांची चोरी झाली होती. आता पोलिसांनी एकूण किती वस्तू परत मिळवल्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.