घराबाहेर पडणं टाळा, पोलिसांचा अलर्ट, रेल्वेचा खोळंबा, पावसामुळे दाणादाण
Maharashtra Rain : भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला असून रात्रभर सुरू असलेला पाऊस अजूनही सुरू असून पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. यामुळे आता नागरिकांना पोलिसांकडून अत्यंत मोठा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. रात्रभर अतिमुसळधार पाऊस झाल्याचे बघायला मिळाले. फक्त मुंबईच नाही तर पूर्ण राज्यात भारतीय हवामान विभागाकडून मोठा अलर्ट जारी करण्यात आलाय. सध्या मुंबईमध्ये सुरू असलेला पाऊस व हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर जाणे टाळावे. तसेच समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळा, असा थेट इशाना मुंबई पोलिसांकडून देण्यात आलाय.
पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून @MumbaiPolice सतर्क व मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास 100 / 112 / 103 डायल करा, असे मुंबई पोलिसांकडून जारी करण्यात आलंय. मुंबईतील धुवाधार पावसाचा परिणाम मुंबई लोकलवर झाल्याचे बघायला मिळतंय.पावसाचा मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या गाड्या 15 मिनिट उशिराने धावत आहेत.
किंग सर्कल परिसरात पाणी भरले आहे. रात्रभर सुरु असलेल्या पावसाने किंग सर्कलला पाणी भरले असून अनेक वाहने यामुळे रस्त्यावरच बंद पडली आहेत. हार्बर मार्गावरील रेल्वे ट्रॅकवर देखील पाणी साचले आहे. काल रात्रभर पडलेल्या पावसामुळे मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले असल्याचे चित्र सध्या बघायला मिळतंय.चेंबूर ते कुर्ला दरम्यान च्या रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे ट्रेन थांबत थांबत जात आहेत. हार्बर मार्गावरील वाहतूक ही 15 मिनिटाने उशिरा ने सुरू आहे.
सध्या मुंबई मध्ये सुरू असलेला संततधार पाऊस व हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर जाणे टाळावे. तसेच समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळा.
पोलीसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून @MumbaiPolice सतर्क व मुंबईकरांच्या मदतीसाठी…
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) August 15, 2025
सायन स्थानकातील रेल्वे रुळालगत पाणी साचल्याने घाटकोपरच्या पुढे रेल्वे वाहतूक संतगतीने सुरू आहे. मध्य रेल्वेची लोकल वाहतूक 20 मिनिटांच्या विलंबाने धावत आहे. सायन आणि कुर्लाच्या मध्ये रेल्वे रुळ लगत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पावसाचा जोर वाढल्यास पाणी जास्त साचण्याची शक्यता आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक सध्या संथ गतीने सुरू आहे. चुनाभट्टी रेल्वे स्थानकामधील रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याच दृश्य पाहायला मिळत आहे. पुढील 24 तास पावसाची अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे.
