पोलीस भरती होणारच, 5300 पदांच्या भरतीसाठी प्रक्रियाही सुरू: अनिल देशमुख

पोलीस भरती होणारच, 5300 पदांच्या भरतीसाठी प्रक्रियाही सुरू: अनिल देशमुख
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री, महाराष्ट्र

मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. मात्र, आम्ही मराठा नेत्यांशी बोललो आहोत. | Anil Deshmukh

Rohit Dhamnaskar

|

Jan 23, 2021 | 1:00 PM

नागपूर: मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली असली तरी राज्यात पोलीस भरती (Police recruitment)  होईल. पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही सुरु झाली आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली. ते शनिवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अनिल देशमुख यांनी पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसल्याचे स्पष्ट केले. (Anil Deshmukh on Police recruitment in Maharashtra)

मराठा आरक्षणामुळे पोलीस भरती प्रक्रियेला थोडा विलंब झाला. मात्र, आम्ही मराठा नेत्यांशी बोललो आहोत. राज्यात पोलीस भरती होणे आवश्यक असल्याचे आम्ही त्यांना सांगितले. ही गोष्ट त्यांनाही पटल्यामुळे मराठा नेत्यांनी पोलीस भरती प्रक्रियेस मान्यता दिली आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया विनासायास पार पडेल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.

पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील. 2538 जागा भरल्यानंतरही गरज पडल्यास पोलीस खात्यात आणखी कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते.

आंदोलन छेडण्याचा मराठा संघटनांचा इशारा

राज्यातील पोलीस भरतीची प्रक्रिया पार पाडण्यासठी ‘एसईबीसी’चे आरक्षण(SEBC) न ठेवण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागानं घेतला होता. त्यामुळे मराठा संघटना आक्रमक झाल्या होत्या. एसईबीसी आरक्षण न देता पोलीस भरती प्रक्रिया राबवली तर मराठा समाजाकडून उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठा संघटनांनी दिला होता.

पोलीस भरतीसाठी ओबीसी महासंघाचा एल्गार

राज्यातील पोलीस भरती मागील 3 वर्षांपासून प्रलंबित असून ती लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केली होती. त्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलनही करण्यात आले होते. महासंघाने भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबवण्याची मागणी केली होती.

संबंधित बातम्या:

पोलीस भरतीबाबत जीआर जारी, SEBC आरक्षण न ठेवता भरती

मोठी बातमी! पोलीस भरतीबाबतचा जीआर रद्द, मात्र भरती कायम, गृहविभागाचा मोठा निर्णय

पोलीस भरतीसाठी ओबीसी महासंघाचा एल्गार, गृहमंत्र्यांच्या निवासस्थानी घंटानाद

(Anil Deshmukh on Police recruitment in Maharashtra)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें