AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकरांनी बाहेर काढलं नवं अस्त्र, राज्यातलं राजकारणच बदलणार, ओबीसींना केलं असं आवाहन की…

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सध्याच्या ओबीसींनी राजकारणात उतरावे, असे आवाहन केले आहे. तसेच धर्म नव्हे तर ओबीसी संकटात आसेही आंबेडकर म्हणाले.

प्रकाश आंबेडकरांनी बाहेर काढलं नवं अस्त्र, राज्यातलं राजकारणच बदलणार, ओबीसींना केलं असं आवाहन की...
prakash ambedkar
| Updated on: Nov 10, 2025 | 4:52 PM
Share

मराठा समाजाला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळत आहे. सरकारच्या जीआरनंतर या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी आरक्षणावर महत्त्वाचे भाष्य केले आहे. आज धर्म नव्हे तर ओबीसी धोक्यात आहेत. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसींच्या राजकीय लढ्याला सुरुवात झाली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

…तेव्हापासून फडणवीसांची भाषा बदलली

प्रकाश आंबेडकर जालन्यात जाहीर सभेत बोलत होते. या सभेत बोलताना त्यांनी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावर भाष्य केले. जरांगे मुंबईत ठिय्या मांडून बसले आणि काँग्रेस, बीजेपी, शिंदे, राष्ट्रवादीचे 190 आमदार आमदार जरांगे यांच्या दर्शनाला गेले. हेच आमदार देवेंद्र फडणीस यांना भेटले तशी फडणवीस यांची भाषा बदलली. याच आमदारांनी जरांगे काय म्हणतात ते ऐकण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सल्ला दिला आणि कुणबी प्रमाणपत्राचा जीआर निघाला, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. तसेच देवेंद्र फडणवीस 2 सप्टेंबर रोजीचा GR रद्द करणार आहेत का? असा सवालही त्यांनी केला.

एसी आणि एसटी हा वर्ग आरक्षणवादी

ओबीसीच्या राजकीय लढाईला सुरवात झाली आहे. ओबीसींनी मोठ्या प्रमाणात आपले उमेदवार जाहीर केले पाहिजेत. प्रत्येक मतदारसंघामध्ये एक तरी ओबीसी मतदार असायला हवा. काही मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव आहेत. काही मतदारसंघ एसटीसाठी राखीव आहेत. एसी आणि एसटी हा वर्ग आरक्षणवादी आहे. हे लक्षात घ्यायला हवे. जे लोक आरक्षणवादी आहेत, त्यांनाच मतदान करायला हवं. आपल मत हे ओबीसीला, आपलं मत हे एसटीला असायला हवे, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.

ओबीसी नेत्यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये

धर्म नाही तर ओबीसी संकटात आला आहे. ओबीसी सत्ताधारी झाल्याशिवाय आरक्षण वाचणार नाही. ओबीसी नेत्यांच्या नाड्या तिसऱ्याच्या हातामध्ये आहेत. कळसुत्री बाहुल्याप्रमाणे हे ओबीसी नेते नाचवलं जात आहेत, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी ओबीसींनी राजकारणात उतरावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ही भूमिका घेतली आहे. त्यामुळे ते ओबीसींची मोट घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. याचे भविष्यात काय परिणाम दिसणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...