AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादा मी येतोय शब्द पाळायला, पण भाऊ म्हणून मला…, प्रसाद लाड यांची जरांगे पाटलांसाठी पोस्ट

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणापूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी "दादा मी येतोय, शब्द पाळायला येतोय" असं म्हणत अत्यंत भावनिक आवाहन केलं आहे.

दादा मी येतोय शब्द पाळायला, पण भाऊ म्हणून मला..., प्रसाद लाड यांची जरांगे पाटलांसाठी पोस्ट
prasad lad manoj jarange
| Updated on: May 29, 2026 | 11:00 AM
Share

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा कमालीचे तापले आहे. मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी भर उन्हात उपोषण करण्याचा इशारा दिल्यामुळे राज्य सरकार पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मनोज जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याने निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी राज्य सरकारचे एक शिष्टमंडळ तातडीने जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले आहे. या महत्त्वपूर्ण चर्चेतून आरक्षणाचा काही सकारात्मक मार्ग निघणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

आता हे उपोषण सुरू होण्यापूर्वीच संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. आज दुपारी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, भाजप आमदार प्रसाद लाड आणि आमदार बच्चू कडू हे अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. या उच्चस्तरीय बैठकीपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना उद्देशून अत्यंत भावनिक संदेश दिला आहे. “दादा मी येतोय… शब्द पाळायला येतोय,” असे म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

प्रसाद लाड काय म्हणाले?

दादा मी येतोय …शब्द पाळायला येतोय सोबत उपमिती अध्यक्षाला घेऊन येतोय….

पण एक भाऊ म्हणून मला शब्द हवा आहे या तापलेल्या उन्हात स्वतःला त्रास करून घेऊ नये.. स्वतःचे पाय आणि अंग पोळवून घेऊ नये.. मुळात उपोषणच आता प्रकृतीला झेपणार नाही.

आपल्या अपेक्षा पूर्तीसाठी आम्ही येत आहोत. मी आणि विखे पाटील साहेब सोबत येत आहोत.

आपल्या मराठा समाजासाठी येतोय… आपल्या मराठा समाजाला तुझी गरज आहे…

एवढच तुझ्या भावाच सांगणं आहे. तू उन्हात स्वतःला त्रास करून घेऊ नकोस!

तुझा मराठा बंधू प्रसाद लाड

स्वतःच्या प्रकृतीला त्रास करून घेऊ नये

दरम्यान प्रसाद लाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सरकार सकारात्मक चर्चा आणि तोडगा काढण्याच्या उद्देशाने येत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच उन्हाची तीव्रता पाहता मनोज जरांगे पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलून स्वतःच्या प्रकृतीला त्रास करून घेऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता या भेटीनंतर मराठा आरक्षणाच्या लढ्याला कोणते नवीन वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Follow Us
केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
राष्ट्रवादीत मोठी खळबळ! केंद्रात मंत्रिपद, पक्षात कार्याध्यक्ष पद मिळत नसल्यामुळे पटेल नाराज?
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे...
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश
Ketan Agarwal Father | माझ्या मुलाला न्याय द्या! केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश; मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप
सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
Amit Thackeray | सोनम वांगचुकांच्या उपोषणाला मनसेचा पाठिंबा; अमित ठाकरे घेणार भेट
अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क...
Mumbai Sea | मुंबईत हायटाईडचा इशारा! 4.49 मीटर उंच लाटा उसळणार; BMC कडून सतर्क राहण्याचे आवाहन
लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद!
Rohini Khadse | लाडक्या बहिणींसाठी साडीही परवडत नाही?; घोषणा मोठ्या... योजना बंद! रोहिणी खडसेंनी सरकारला कोंडीत पकडलं
शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक
Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!
एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक
West Bangal | एकाच क्षणात होत्याचं नव्हतं! रेल्वे क्रॉसिंगवर शाळेच्या व्हॅनला ट्रेनची जोरदार धडक, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल....
Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!
एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री.

एसटीच्या भाड्यात झाली इतक्या टक्क्यांनी वाढ ; ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांच्या खिशाला पडणार कात्री

मुंबई हुंड्यात मिळाली ? ‘दादर’ नावाचे गावच नव्हते, मग कसे पडले नाव ?.

मुंबई हुंड्यात मिळाली ? ‘दादर’ नावाचे गावच नव्हते, मग कसे पडले नाव ?

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी आहे खासियत.

FIFA World Cup 2026 स्पर्धेच्या विजेत्या संघाला ट्रॉफी आणि मेडलशिवाय अंगठीही मिळेल, अशी आहे खासियत

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा.

डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, इराणचा भीषण हल्ला; अमेरिकन लढाऊ विमानांचा खात्मा

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?.

नमाजवर संपूर्ण देशात बंदी घाला, थेट राष्ट्रपतींना पत्र; नेमकी कुणी केली मागणी?

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा.

‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा