AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लातूर मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा हवाई सफर, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये लातूर महानगरपालिकेस जीएफसी शहराचा दर्जा प्राप्त झाला असून फाईव्ह स्टार मानांकन मिळाले आहे. असे मानांकन मिळवणारी लातूर ही मराठवाड्यातील एकमेव महानगरपालिका आहे. शनिवारी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीराम कोंविद यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

लातूर मनपाच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा हवाई सफर, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराचे वितरण
लातूर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी पुरस्कार घेण्यासाठी दिल्ली येथे दाखल
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 11:58 AM
Share

लातूर : स्वच्छ सर्वेक्षणमध्ये (Latur Municipal Corporation) लातूर महानगरपालिकेस जीएफसी शहराचा दर्जा प्राप्त झाला असून फाईव्ह स्टार मानांकन मिळाले आहे. असे मानांकन मिळवणारी लातूर ही मराठवाड्यातील एकमेव महानगरपालिका आहे. शनिवारी दिल्ली येथे राष्ट्रपती श्रीराम कोंविद यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. त्याअनुशंगाने लातूर महानगरपालिकेचे पाच स्वच्छता कर्मचारी आणि महापौर विक्रांत गोजमगुंडे विमानाने दिल्लीला पोहचले आहेत.

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेने सुरुवातीपासूनच कचरामुक्त शहराचे ध्येय ठेवून काम केले. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि गल्लीबोळातील कचरा वर्गीकरण करून संकलित करण्यासोबतच प्रक्रिया प्रकल्पही उभारला आहे. मनपाच्या कचरा डेपोवर संकलित केल्या गेलेल्या 3 लाख टन कचऱ्यावर प्रक्रिया करून 6 एकर जागा रिकामी केली. शहरात चार ठिकाणी विकेंद्रीत कचरा विलगीकरण केंद्रांची स्थापना केली. बदलत्या काळानुसार आधुनिकतेची कास धरत कचरामुक्तीचे व्यवस्थापन केल्याने हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

देश पातळीवरचा जीएफसी- फाईव्ह स्टार शहराचा दर्जा

शहराच्या बाजारपेठांमध्ये दिवसा स्वच्छता करणे अडचणीचे असल्याने रात्र सफाई मोहीम सुरू करून बाजारपेठांची दैनंदिन स्वच्छता केली जात होती. कचरामुक्तीचा संकल्प पूर्णत्वास नेतानाच सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात आला. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज 4 लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया सुरू झाली. मराठवाड्यात पहिली आणि एकमेव असणारी सॅनिटरी लॅंडफिल साईट लातूर महानगरपालिकेने उभारली. दरवर्षी पारंपरिक पद्धतीने होणारे गणेश विसर्जन न करता मुर्ती दान करण्याचा उपक्रम राबवला होता. मनपाकडे केवळ चारशे कर्मचारी असताना हे सर्व कार्य यशस्वीपणे पार पाडत लातूर शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे काम केले आहे.

मराठवाड्यातील पहिलीच महानगरपालिका

कचरा व्यवस्थेपासून स्वच्छतेपर्यंतचे वेगवेगळे उपक्रम लातूर मनपाने राबवलेले आहेत. घरातील ओला आणि सुका कचरा याचेही वर्गीकरण करुन त्याचे संकलन करण्यात आले होते. या विविध उपक्रमामुळेच देशपातळीवर मनपाची नोंद घेण्यात आली आहे. स्वछ सर्वेक्षणात देश पातळीवरचा जीएफसी- फाईव्ह स्टार शहराचा दर्जा मिळालाआहे. फाईव्ह स्टार मानांकन मिळवणारी ही मराठवाड्यातील पहिली महानगर पालिका आहे.

स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही पहिलाच अनुभव

स्वच्छतेबाबतचा पुरस्कार घेण्यासाठी महापौरांसह मनपातील पाच स्वच्छता कर्मचारी हे विमानाने दिल्लीला रवाना झाले आहेत. विमानाने प्रवास करण्याचा कर्मचाऱ्यांचाही पहिलाच अनुभव आहे. ज्या हातांनी शहराच्या स्वच्छतेसाठी परीश्रम घेतले त्यांनाच हा पुरस्कार मिळणे आवश्यक असल्याने या पाच कर्मचाऱ्यांना विमानाने दिल्ली वारी घडलेली आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. मनपाच्या या यशाचे आणि कर्मचाऱ्यांना विमान सवारी घडवून आणण्याचे कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या :

पत्नीचा खून करण्यासाठी घेतले दुकानातून कटर अन् मुलीसाठी चॉकलेट, चेहऱ्यावर असंख्य वार, औरंगाबादेत पतीला अटक

औरंगाबादेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन नव्या नगरसेवकांची अखेर हकालपट्टी, मूळ पक्ष MIM अन् गुन्हेगारी पार्श्वभूमी!

दारूविरोधात महिला आक्रमक; ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मंजूर

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.