पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरुन साताऱ्यात आंदोलन, उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचाही पाठिंबा

पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गावरुन सध्या साताऱ्यात (Pune-Satara national highway protest) रणकंदन सुरु आहे.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरुन साताऱ्यात आंदोलन, उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचाही पाठिंबा

सातारा : पुणे-सातारा या राष्ट्रीय महामार्गावरुन सध्या साताऱ्यात (Pune-Satara national highway protest) रणकंदन सुरु आहे. सोशल मीडियावरही सध्या या महामार्गाच्या कामाचे वाभाडे काढले जात आहेत. अत्यंत खराब रस्ता (Pune-Satara national highway protest) म्हणून याची ओळख असल्याच्या पोस्ट सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत (Pune-Satara national highway protest) आहेत. माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचाही या आंदोलनाला पाठिंबा आहे.

या महामार्गाचं काम गेल्या 9 वर्षांपासून अपूर्ण आहे, तरी सुद्धा 6 लेनची भरमसाठ टोल वसुली गेले कित्तेक वर्षांपासून सुरुच आहे. त्यामुळे या रोडवरुन जाणारे प्रवासी आणि सातारकर मेटाकुटीला आलेत. या रस्त्याचे काम ताबडतोब पूर्ण करावे याकरिता साताऱ्यात एक जनांदोलन उभं राहील आहे. रस्त्याचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल माफ करावा, अशी मागणी पुणे-मुंबई या ठिकाणी काम करणाऱ्या मुलांनी शासन दरबारी केली आहे.

या रस्त्याच्या आंदोलनासाठी आता माजी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनीही पाठिंबा दिला आहे. तसेच 1 डिसेंबरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण केले नाही, तर टोल बंद असा दमही प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे साताऱ्याच्या प्रशासनामध्ये खळबळ माजली आहे.

माहामार्ग प्रशासन आता उदयनराजेंचा हा दम किती गांभीर्याने घेतात हे महत्वाचं आहे. कारण 13 दिवसांत या महामार्गाचं काम पूर्ण होणं खूपच अशक्य आहे. यानंतर टोल बंदीसाठी उदयनराजे रस्त्यावर उतरले, तर साताऱ्यात पुन्हा टोलवरुन राडा होईल, अशी शक्यता वर्तवली जात (Pune-Satara national highway protest) आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *