ऊसतोड कामगारांना दिलासा, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळासाठी 20 कोटींची तरतूद

लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास पहिल्यांदाच 20 कोटी रुपये इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांदरम्यान ही तरतूद करण्यात आलीय.

ऊसतोड कामगारांना दिलासा, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कल्याण महामंडळासाठी 20 कोटींची तरतूद
ऊसतोड कामगार
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 5:48 PM

मुंबई : ऊसतोड कामगारांना दिलासा देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केलाय. लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास पहिल्यांदाच 20 कोटी रुपये इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांदरम्यान ही तरतूद करण्यात आलीय. मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निधी उपलब्ध करून देण्याबाबतची घोषणा झाली होती. (Provision of Rs. 20 crore for Gopinath Munde Ustod Welfare Corporation)

गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या वाटचालीची ही सुरुवात आहे; आणखी खूप कामे करणं बाकी आहे. राज्य सरकारने ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला कधीही निधीची कमतरता भासणार नाही, अशी व्यवस्था केली आहे. आज पहिल्यांदाच महामंडळाला 20 कोटी रुपये आर्थिक तरतूद केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानतो, अशा शब्दात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत.

20 वसतिगृहे याच शैक्षणिक वर्षात उभारण्यास राज्य शासनाची मान्यता

अनेक वर्षे फक्त कागदावर आणि घोषणेपूरतं मर्यादित राहिलेल्या ऊसतोड कामगार कल्याण महामंडळास धनंजय मुंडे यांनी आपल्या खात्याकडे वर्ग करून घेतल्यानंतर या महामंडळास खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त झालं आहे. ऊसतोड कामगारांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे यादृष्टीने नुकतीच धनंजय मुंडे यांनी संत भागवनबाबा शासकीय वसतिगृह योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर अवघ्या काही दिवसातच संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेंतर्गत 10 जिल्ह्यातील 41 तालुक्यात 82 वसतिगृहे उभारण्यास आणि यांपैकी 20 वसतिगृहे याच शैक्षणिक वर्षात उभारण्यास राज्य शासनाने मान्यता दिलीय.

20 कोटी रुपये महामंडळ भागभांडवल म्हणून तरतूद

अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्याप्रमाणे आता जुलै 2021 या पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात पुरवणी मागण्यांच्या यादीत या महामंडळास भागभांडवल अंशदान म्हणून 10 कोटी रुपये, सहाय्यक अनुदान म्हणून 10 कोटी, असे एकूण 20 कोटी रुपये महामंडळ भागभांडवल म्हणून तरतूद करण्यात आली आहे. ऊसतोड कामगारांसाठी अनेक नेते पुढे आले, अनेक वर्ष विविध घोषणा झाल्या मात्र त्यांच्या कल्याणासाठी कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलं नाही. धनंजय मुंडे यांनी मात्र सत्तेत आल्यानंतर दीड वर्षांच्या आत ऊसतोड कामगारांबाबत ठोस निर्णय घेऊन महामंडळास मूर्त स्वरूप प्रदान केलं आहे.

संबंधित बातम्या :

तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल, अतुल भातखळकरांचा घणाघात

Breaking : विधानसभेत तुफान राडा; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, कोणकोणत्या आमदारांचा समावेश?

Provision of Rs. 20 crore for Gopinath Munde Ustod Welfare Corporation

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.