रुपाली ठोंबरे पाटील यांची भाजपावर जोरदार टीका, थेट म्हटले, तुम्ही अगोदर..
महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकारण चांगलेच तापताना दिसत आहे. पुण्यात अजित पवार गट आणि भाजपामधील वाद पेटला आहे. त्यामध्येच रूपाली ठोंबरे पाटील यांनी भाजपावर टीका केली.

महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असून रुपाली ठोंबरे पाटील यांनी नुकताच मोठा आरोप केला. रुपाली ठोंबरे पाटील अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत. रुपाली ठोंबरे या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आहेत. रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल बोलताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले की, पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेले आहे, राज्य सरकारमध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत. मात्र, महापालिकेसाठी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे वेगवेगळे लढत आहेत. जय जितेंद्र जे तुम्ही म्हणताय ते खासदार मुरलीधर मोहोळ यांनी जे आमच्या अजित पवारांबद्दल वक्तव्य केलं त्याला अजित पवारांनी उत्तर दिले. मुरलीधर मोहोळ यांनी जर आमच्या पक्षावर किंवा अजित पवारांवर टीका केली नसती तर आम्हाला ही बोलण्याची वेळ आली नसती.
सुरुवात भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून झाली. त्यामुळे अजित पवार जय जितेंद्र बोलले. मुरली अण्णा आता नगरसेवकावरून खासदार झाले आणि केंद्रीय मंत्री झाले. अजित पवार राज्याचे राजकारण 40 वर्षापासून करत आहेत. याचाच अर्थ मुरली अण्णाला वडीलधारे अजित पवार आहेत. अजित पवार यांनी गुन्हेगारीवरती वचक ठेवण्यासाठीचे आदेश पोलीस आयुक्तांना कायद्याने राबवले आहेत. मोहोळ तुम्ही आमच्यावरती आरोप करताना स्वतःच्या गिरेबानमध्ये पाहिलं पाहिजे. तुम्ही काय करताय स्वतः खालचा अंधार झाकून ठेवताय.
विनाकारण निवडणुकीमध्ये आरोप करायचे आहेत म्हणून अजित पवारांवर करत आहात. राष्ट्रवादी पार्टीने शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना तिकीट दिलं नाही. भाजपाने जी तिकीट दिले आहे ज्याला पळून लावलेलं आहे त्याच्याबद्दल मुरली अण्णा कधी तोंड उघडणार आहेत. जेव्हा ते आमच्याकडे एक बोट करतील तेव्हा त्यांच्याकडे चार बोट आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल बोलताना रुपाली ठोंबरे यांनी म्हटले की, त्यांना आधी नाही का सुचला शहाणपणा.
भाजपाला ऐन टायमालाच शहाणपण सुचतं. भाजपाच कस आहे वापरा आणि सोडून द्या. निवडणूक आली की समाजामध्ये तेढ निर्माण करा.. नको ती प्रकरणे बाहेर काढा. आता सत्तेत असलेल्याचा गैरफायदा घ्या. कशाला आम्हाला बोलायला लावता एवढेच वाटत होतं तर तीन वर्षांपूर्वीच जायचं मुख्यमंत्र्यांकडे. काहीतरी बालिश वक्तव्य प्रदेशाध्यक्षांनी करू नयेत, असे त्यांनी म्हटले. प्रवीण दरेकर यांना मला हेच सांगायचं की आधी ही चौकट तोडली कोणी. भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहाळ आधी बोलले… त्यांनी आमच्यावरती आरोप केले आम्ही त्यांना जशास तसे उत्तर दिलं…
