
पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झालं आहे, या महापालिकेची मुदत संपल्यानंतरही निवडणुका झाल्या नव्हत्या अखेर निवडणुकीला मुहूर्त लागला. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होत आहे. पुणे महापालिकेत गेल्यावेळी भाजपने दणदणीत यश मिळवलं होतं. एकूण 172 जागांपैकी 97 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर राष्ट्रवादीला देखील चांगला यश मिळालं होतं. राष्ट्रवादीच्या वाट्याला पुण्यात 39 जागा आल्या. काँग्रेस आणि शिवसेनेला म्हणाव असं या महापालिकेत यश मिळालं नाही, शिवसेनेचे दहा तर काँग्रेसचे 9 नगरसेवक या निवडणुकीत निवडून आले. मात्र यावेळी परिस्थिती बदललेली आहे. या वेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यामुळे महापालिका निवडणुकीत चुरस पहायला मिळू शकते.
प्रभाग क्रमांक 9 – पुण्याच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये पुण्याचा बाणेर बालेवाडी, आणि पाषाण या भागाचा समावेश होतो. या प्रभागात एकूण चार वार्ड असून, गेल्यावेळी या प्रभागात भाजपचाच दबदबा दिसून आला होता, तीन वार्डामध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, तर एका वार्डात राष्ट्रवादीच्या उमेदवारानं विजयाचा गुलाल उधळला होता. वार्ड क्रमांक 9 अ मधून भाजपच्या उमेदवार स्वप्नाली सायकर या विजयी झाल्या होत्या, तर ब मधून भाजपच्या उमेदवार ज्योती कलमकर या विजयी झाल्या, क मधून भाजपचे उमेदवार अमोल बालवाडकर यांनी बाजी मारली, तर ड मध्ये मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांडोरे विजयी झाले होते.
सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर
जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही
BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?
एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का
ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा
राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज
प्रभाग क्रमांक 10 – पुण्याच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये बावधन आणि कोथरूड डेपो या भागाचा समावेश होतो. या प्रभागातील चारही वार्डात गेल्यावेळी भाजपने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक 10 अ मधून भाजपचे उमेदवार किरण पाटील हे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक ब मधून श्रद्धा प्रभुणे पाठक या विजयी झाल्या होत्या तर क मधून अल्पना गणेश वरपे या विजयी झाल्या आणि ड मध्ये भाजपचेच उमेदवार दिलीप पाटील हे विजयी झाले. दरम्यान याही वेळी भाजपची जादू कायम राहणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या लिंक्स
महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स
बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV
महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE